नवी दिल्ली - इतिहासातील महत्त्वाच्या वळणावर समाजआला असल्याचे भारतीय उद्योग महासंघाचे नवनियुक्त अध्यक्ष उदय कोटक यांनी म्हटले आहे. भारतीय उद्योगांनी परिवर्तन आणि आत्मनिर्भर भारताच्या बांधणीसाठी सकारात्मक दृष्टीने गुंतवणुकीकडे पाहावे, असा सल्ला त्यांनीदिला.
'आत्मनिर्भर भारताकरिता उद्योगांनी गुंतवणूक करण्यासाठी योग्य वेळ' - उदय कोटक न्यूज
कोरोनाच्या संकटाचा संधी म्हणून उपयोग करावा, असे उदय कोटक यांनी भारतीय उद्योगांना आवाहन केले. नव्या रणनीतीच्या क्षेत्रांमध्ये नवीन आणि धाडसी गुंतवणूक करण्यासाठी उद्योगांनी कचरू नये, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.
कोरोनाच्या संकटाचा संधी म्हणून उपयोग करावा, असे उदय कोटक यांनी भारतीय उद्योगांना आवाहन केले. नव्या रणनीतीच्या क्षेत्रांमध्ये नवीन आणि धाडसी गुंतवणूक करण्यासाठी उद्योगांनी कचरू नये, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. कोटक हे कोटक महिंद्रा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. संकटाच्या काळात तग धरून राहण्यासाठी उद्योगांनी राखीव निधी ठेवावा, असा सल्ला त्यांनी उद्योगांना दिला.
पंतप्रधानांच्या 'आत्मनिर्भर भारत' या संकल्पनेने खूप उत्साहित झाल्याचे कोटक यांनी यावेळी सांगितले. आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि ग्रामीण पायाभूत सुविधा यासारख्या क्षेत्रांत गुंतवणूक वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आरोग्य क्षेत्रात राष्ट्रीय सकल उत्पादनाच्या 1.3 टक्के खर्च करण्यात येतो. हा निधी वाढून पाच टक्के ते दहा टक्के करण्यात आला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.