नवी दिल्ली- समाज माध्यम कंपनी व्हॉट्सअप आणि इन्स्टाग्राम अचानक शुक्रवारी रात्री सुमारे ११ वाजता बंद पडले. त्यामुळे वापरकर्त्यांनी ट्विटरसह इतर समाज माध्यमामधून रोष व्यक्त केला होता.
व्हॉट्सअपच्या वापरकर्त्यांनी मेसेज पाठविता येणे व मिळविणे शक्य नसल्याचे म्हटले होते. तसेच इन्स्टाग्रामवरील मेसेंजरही काम करत नव्हते. पोर्टलचे स्वतंत्र ट्रॅकिंग करणारे पोर्टल डाऊनडिटेक्टरने याविषयी शुक्रवारी रात्री माहिती दिली होती. फेसबुकने तांत्रिक त्रुटी दूर केल्याचे शुक्रवारी रात्री उशिरा म्हटले आहे.
फेसबुकच्या प्रवक्त्याने म्हटले की, तांत्रिक त्रुटीमुळे लोकांना फेसबुकची सेवा मिळविण्यात अडचणी आल्या आहेत. आम्ही प्रत्येकासाठी त्रुटी दूर केली आहे. गैरसोयीबद्दल दिलगीर असल्याचे व्हाटअप प्रवक्त्याने म्हटले आहे.