महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

महत्त्वाचे पाऊल : जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळित राहण्याकरता स्वतंत्र कक्ष

जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा व वितरण याबाबतच्या तक्रारी controlroom-dpiit@gov.in वर करता येणार आहेत. तर या ०११-२३०६२४८७ टेलिफोनवर माहिती देण्यात येणार आहे. हा फोन क्रमांक सकाळी ८ ते ६ सायंकाळी सुरू राहणार आहे.

जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा
जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा

By

Published : Mar 26, 2020, 5:31 PM IST

नवी दिल्ली - जीवनावश्यक वस्तू २१ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये मिळतील का नाही, अशी नागरिकांना चिंता आहे. यावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने पाऊल उचलले आहे. जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा आणि वाहतूक याची अपडेट माहिती मिळविण्यासाठी औद्योगिक प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाने (डीपीआयआयटी) देखरेख कक्ष स्थापन केला आहे.

लॉकडाऊन असलेल्या २५ मार्च ते १४ एप्रिलमध्ये कालावधीत येणाऱ्या समस्यांवर डीपीआयआयटीच्या कक्षाची नजर असणार आहे. जर जीवनावश्यक वस्तुंचे उत्पादक, वाहतूक, वितरक, घाऊक विक्रेते अथवा ई-कॉमर्स कंपन्यांना कोणतीही प्रत्यक्षस्थळी अडचणी आली तर त्याची डीपीआयआयटीला माहिती मिळणार आहे.

जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा व वितरण याबाबतच्या तक्रारी controlroom-dpiit@gov.in वर करता येणार आहेत. तर या ०११-२३०६२४८७ टेलिफोनवर माहिती देण्यात येणार आहे. हा फोन क्रमांक सकाळी ८ ते ६ सायंकाळी सुरू राहणार आहे.

हेही वाचा-कोरोनाचा फटका : स्वगृही परतण्यासाठी मजुराचा पायी प्रवास, दोन दिवसांनी पोहोचला घरी

भागीदारांच्या समस्यांची नियंत्रण कक्षाकडून नोंद घेण्यात येणार आहे. त्यावर राज्य सरकार, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि इतर सरकारी संस्थांकडून कार्यवाही करण्यात येणार आहे. उद्योग, व्यापार यांनी काही अडचणी आल्या तर त्याविषयी नियंत्रण कक्षाला कळवावे, असे डीपीआयआयटीने म्हटले आहे.

हेही वाचा-शेअर बाजाराची १,४११ अंशांनी उसळी; आर्थिक पॅकेज जाहीर झाल्याचा परिणाम

जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठ्यात अडथळा येत असल्याची ई-कॉमर्स कंपनी आणि ट्रेडर्सने नुकतेच तक्रार केली होती. काही ठिकाणी पोलिसांनी जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणाऱ्यांना मारहाण केल्याचे समोर आले होते. देशातील जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळित चालू राहण्यासाठी केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी डीपीआयआटी विभाग व व्यापाऱ्यांची बुधवारी बैठक घेतली.

हेही वाचा-कर्नाटकमध्ये किराणासह सुपरमार्केट सुरू राहणार 24x7

ABOUT THE AUTHOR

...view details