नवी दिल्ली - दिल्लीमधील सर्व मोठ्या घाऊक आणि किरकोळ बाजारपेठा आज बंद राहिल्या आहेत. कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी अखिल भारतीय व्यापारी संघटनेने (सीएआयटी) तीन दिवसाचा बंद आजपासून जाहीर केला आहे.
सीएआयटीच्या माहितीनुसार दिल्लीमधील १४ लाख व्यवसायिक आस्थापना बंद राहिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाला संबोधित असताना घरातून काम करण्याचे आवाहन केले होते. तसेच कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी काळजी घेण्यास सांगितले होते. त्याला प्रतिसाद म्हणून व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली आहेत.
हेही वाचा-रेल्वेचे तिकिट रद्द झाले तरी चिंता नको...४५ दिवसापर्यंत मागू शकता रिफंड