महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

'मोठ्या उद्योगांसह सरकारकडे एमएसएमई उद्योगांचे ५ लाख कोटी रुपये थकित'

खेड्यात उद्योग सुरू व्हावे यासाठी एमएसएमई उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येणार असल्याची नितीन गडकरींनी माहिती दिली.

संग्रहित - नितीन गडकरी
संग्रहित - नितीन गडकरी

By

Published : May 25, 2020, 8:31 PM IST

नवी दिल्ली- एमएसएमई उद्योगांचे ५ लाख खोटी रुपये सरकारी संस्था, सार्वजनिक कंपन्या आणि मोठ्या उद्योगांकडे थकित असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. ते व्हिडिओद्वारे मेंबर्स ऑफ कोलकाता चेंबरच्या सदस्यांशी बोलत होते.

आपले मंत्रालय आणि सार्वजनिक कंपन्यांकडून एमएसएमईची थकित रक्कम ही ४५ दिवसात दिली जाईल, असे नितीन गडकरींनी आश्वासन दिले. एमएसएमई उद्योगांचे थकित पैसे राज्यांनी द्यावेत, अशी विनंती केल्याचे गडकरींनी सांगितले.

हेही वाचा-धक्कादायक! कोरोनच्या संकटाने 'या' क्षेत्रातील ४० टक्के कंपन्या पूर्णपणे बंद पडणार

मोठ्या उद्योगांना एमएसएमईचे थकित पैसे द्यावे, असे वारंवार आवाहन करत असल्याचे गडकरींनी सांगितले. बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांची वित्तपुरवठ्यामध्ये महत्त्वाची भूमिका असल्याने त्यांच्यासाठी सरकारने योजना आणली आहे. खेड्यात उद्योग सुरू व्हावे यासाठी एमएसएमई उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येणार असल्याची गडकरींनी माहिती दिली.

हेही वाचा-स्थावर मालमत्ता क्षेत्राला तत्काळ मदत करा- क्रेडाईची पंतप्रधानांकडे मागणी

दरम्यान, केंद्र सरकारने एमएसएमई क्षेत्रासह विविध क्षेत्रांना दिलासा देणारे २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details