नवी दिल्ली - महिंद्रा अँड महिंद्राने गुरुवारी १,५७७ डिझेल थर वाहने परत मागविल्याचे जाहीर केले आहे. इंजिनच्या सुट्ट्या भागांमध्ये दोष आढळल्याने महिंद्राने हा निर्णय घेतला आहे.
दक्षता म्हणून डिझेल थरमधील १,५७७ कॅमशॅफ्ट बदलणार असल्याचे महिंद्रा अँड महिंद्राने म्हटले आहे. हे इंजिनचे सुट्टे भाग ७ सप्टेंबर ते २५ डिसेंबर दरम्यान तयार करण्यात आले होते. पुरवठादाराकडून मशिन सेटिंगमध्ये त्रुटी निर्माण झाली होती. त्याचा डिझेल थरमधील काही इंजिनवर परिणाम होऊ शकतो, असे एम अँड एमने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
हेही वाचा-तिसऱ्या तिमाहीत स्टेट बँकेच्या नफ्यामध्ये ७ टक्क्यांची घसरण