नवी दिल्ली - महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा हे नेहमीच ट्विटमुळे चर्चेत असतात. सध्या, ते ऑलिम्पिक विजेत्याला देण्यात येणाऱ्या गिफ्टमुळे चर्चेत आले आहेत. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राला महिंद्रा यांनी एक्स यूव्ही 700 गिफ्ट देऊ केली आहे. याबाबतचे त्यांनी ट्विट केले आहे.
नीरज चोप्राने भारताला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून दिले आहे. एका वापरकर्त्याने महिंद्रा यांना उद्देशून चोप्रा याला एक्सयूव्ही 700 देणार का, असे विचारले. त्यावर आनंद महिंद्रा यांनी लगेच उत्तर दिले. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की हो, खरोखर. आमच्या गोल्डन अॅथिलिटला एक्सयू्ही 700 भेट देणे हा माझ्यासाठी बहुमान असणार आहे. त्यांनी हे ट्विट महिंद्रा अँड महिंद्राचे कार्यकारी संचालक राजेश जेजुरीकर आणि कंपनीचे सीईओ विजय नक्रा यांना टॅग केले. या ट्विटमध्ये त्यांनी एक वाहन त्याच्यासाठी तयार ठेवा, असे म्हटले आहे.
हेही वाचा-नीरज, तू देशाचं स्वप्न पूर्ण केलं, धन्यवाद..! अभिनव बिंद्राचं ट्विट
जेव्हेलिन भालाफेकचे प्रतिक असलेल्या नाण्याचा फोटो ट्विट केला आहे. अशा प्रकारचे नाणे नीरज चोप्रासाठी काढावे, अशी अपेक्षा त्यांनी केले. हे ट्विट त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांना टॅग केले आहे.
भारतीय अॅथलिट नीरज चोप्रा याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. नीरजने भालाफेक स्पर्धेमध्ये भारतासाठी टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिलं सुवर्ण पदक जिंकलं. पात्रता फेरीत नीरजची कामगिरी शानदार होती आणि त्याने अॅथलिटमध्ये 121 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला. नीरजने अंतिम सामन्यात पहिला थ्रो 87.03 मीटर केला. तर दुसरा थ्रो त्याने 87.58 मीटर करत सुवर्ण पदक निश्चित केलं.