मुंबई- वाहन उद्योग कंपनी महिंद्रा अॅण्ड महिंद्राने कोरोना योद्धे आणि महिलांसाठी खास कर्ज योजना जाहीर केली आहे. या योजनेमध्ये कर्ज परतफेडीची मुदत ८ वर्षांची आहे. तर वाहनाच्या रोड किमतीवर १०० टक्के कर्ज देण्यात येणार आहेत.
आवाहनात्मक संकटात अधिक मदत करण्यासाठी अनोखी कर्ज योजना आणल्याचे महिंद्राने कंपनीने म्हटले आहे. कर्जाच्या योजनेमधून ग्राहकांना वित्तीय लवचिकता देण्यात आली आहे. कर्जाच्या योजनेमध्ये प्रक्रिया शुल्क ५० टक्के माफ करण्यात आले आहे. डॉक्टरांनी वाहन खरेदी गेल्यानंतर ९० दिवसांनी ते पैसे देऊ शकणार आहेत. तसेच पोलीस कर्मचारी आणि महिलांना १० टक्के सवलतीत कर्ज दिले जाणार आहे.