महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

महिंद्राची श्रीलंकेतील बाजारपेठेत मुंसडी; पहिल्या स्वयंचलित असेंब्ली उत्पादन प्रकल्पाचे अनावरण

ख्रिस्टन्ड महिंद्रा आयडियल लंका प्रायव्हेट लिमिटेडने श्रीलंकेमधील आयडियल मोटर्स कंपनीबरोबर भागिदारी करून उत्पादन प्रकल्प सुरू केला आहे. या उत्पादन प्रकल्पामधून एसयूव्ही, केयूव्ही १०० या वाहनांचे उत्पादन घेण्यात आले आहे.

संग्रहित

By

Published : Aug 17, 2019, 2:32 PM IST

Updated : Aug 17, 2019, 3:58 PM IST

नवी दिल्ली - वाहन उद्योगामधील कंपनी महिंद्रा अॅण्ड महिंद्राने (एम अॅण्ड एम) श्रीलंकेमधील पहिल्या स्वयंचलित असेंब्ली उत्पादन अनावरण झाल्याची घोषणा केली. महिंद्रा अॅण्ड महिंद्रा ही ख्रिस्टन्ड महिंद्रा आयडियल लंका प्रायव्हेट लिमिटेड या नावाने वाहनांचे उत्पादन घेणार आहे.

ख्रिस्टन्ड महिंद्रा आयडियल लंका प्रायव्हेट लिमिटेडने श्रीलंकेमधील आयडियल मोटर्स कंपनीबरोबर भागिदारी करून उत्पादन प्रकल्प सुरू केला आहे. या उत्पादन प्रकल्पामधून एसयूव्ही, केयूव्ही १०० या वाहनांचे उत्पादन घेण्यात आले आहे. येत्या तीन वर्षात आणखी नव्या मॉडेलचे उत्पादन घेण्यात येईल, असे कंपनीने म्हटले आहे.

श्रीलंकेच्या बाजारपेठेत हा कोलंबोजवळील उत्पादन प्रकल्प मैलाचा दगड ठरणार असल्याचे महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे व्यवस्थापकीय संचालक पवन गोयंका यांनी सांगितले. महिंद्रा आयडियल लंका ही केयूव्ही १०० असेंब्ल करणार आहे. प्रकल्पामधून ५ हजार वाहनांचे उत्पादन करण्याची क्षमता आहे. महिंद्रा कंपनी वाहनांसाठी स्थानिक भागांमधून बॅटरी, टायर, सीट्स, एक्जहॉस्ट घेणार आहे.

Last Updated : Aug 17, 2019, 3:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details