नवी दिल्ली - महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी कोरोनाविरोधातील लसीच्या वितरणासाठी सरकारला महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. कोरोनाची लाट हा गंभीर धोका आहे. अशा नव्या लाटेविरोधात मोठ्या प्रमाणात लसीकरण ही भारतासाठी सर्वात मोठी आशा असल्याचे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे.
उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी व्हिडिओग्राफिक्स ट्विट करत केंद्र सरकारचे कोरोनाविरोधातील लसीकरणाकडे लक्ष वेधले आहे. लसीकरणात भारत जगात चौथ्या क्रमांकावर असणे हे पुरेसे नाही. आपल्याकडे उत्पादन क्षमता असल्याचे महिंद्रा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. कोरोनाविरोधातील लसीकरणासाठी खासगी क्षेत्राच्या क्षमतेचा वापर करणे आवश्यक आहे. हे ट्विट त्यांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना टॅग केले आहे.
हेही वाचा-सोन्याच्या दरात किंचित घसरण; चांदी प्रति किलो ९५ रुपयांनी महाग