नवी दिल्ली- विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरची खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. सरकारी कंपनी इंडियन ऑईलने विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरची (एलपीजी) किंमत १४४ रुपयांनी वाढविली आहे. हे दर बुधवारपासून लागू होणार आहेत.
एलपीजी सिलिंडरचे दर १ जानेवारी २०२० पासून वाढविण्यात आले नव्हते. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार दिल्लीत इंडेन गॅसची किंमत ८५८.५० रुपये (१४४.५० रुपयांची दरवाढ) असणार आहे. कोलकात्यात गॅस सिलिंडरची किंमत ८९६. रुपये (१४९ रुपयांची दरवाढ), मुंबईत ८२९.५० (१४५ रुपयांची दरवाढ) रुपये सिलिंडरची किंमत आहे. चेन्नईत १४७ रुपयांनी सिलिंडरची किंमत वाढून ८८१ रुपये झाली आहे.