नवी दिल्ली -सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांनी व्यावसायिक वापरातील एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत १०० रुपयांनी कमी केली आहे. व्यावसायिक वापरासाठी असलेल्या १९ किलोच्या गॅस सिलिंडरची किंमत १२२ रुपयांनी कमी केली आहे. या दर कपातीने १ जूनपासून १९ किलोच्या व्यावयासिक गॅस सिलिंडरची किंमत १४७३.५० रुपये होणार आहे. यापूर्वी व्यावसायिक वापरातील गॅस सिलिंडरची किंमत १५९५.५० रुपये होती.
विविध शहरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत वेगवेगळी आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरचा वापर हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळी इत्यादी ठिकाणी करण्यात येतो. प्रमुख महानगरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत खालील प्रमाणे आहे.
- दिल्ली — १४७३.५० रुपये
- मुंबई — १४२२.५० रुपये
- कोलकाता— १५४४.५० रुपये
- चेन्नई — १६०३ रुपये
हेही वाचा-पुण्यातील शिवाजीराव भोसले बँकेचा परवाना रद्द, रिझर्व्ह बँकेचा दणका
बिगर अनुदानित एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत प्रमुख चार महानगरांमध्ये १ एप्रिलपासून १० रुपयांनी कमी केली होती. सध्या दिल्ली, मुंबई या शहरांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ८०९ रुपये आहे.