नवी दिल्ली- इलेक्ट्रिक वाहनांकरिता केंद्र सरकारने विविध सवलती जाहीर केल्याचा परिणाम दिसून येत आहे. हिरो इलेक्ट्रिक कंपनीने विस्तार करणार असल्याचे जाहीर केले आहे. इलेक्ट्रिक वाहनांकरिता अनुकूल स्थिती असल्याने हा निर्णय घेतल्याचे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
इलेक्ट्रिकचे व्यवस्थापकीय संचालक नवीन मुंजाल यांनी हिरोच्या भविष्यातील नियोजनाविषयी माहिती दिली. ते म्हणाले, हिरो कंपनी इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये येत्या तीन वर्षात ७०० कोटींची गुंतवणूक करणार आहे. यामधून इलेक्ट्रिक स्कूटरचे वार्षिक उत्पादन १ लाखांवरून ५ लाख करण्यात येणार आहे. पुढे ते म्हणाले, प्रत्येकबाबतीत आम्ही विस्तार करत आहोत. त्यामध्ये आम्हाला मागे वळून पाहायचे नाही. वितरकांचे जाळे, मनुष्यबळ, प्रोडक्ट पोर्टफोलिओ आणि उत्पादन इत्यादींचा समावेश आहे.