नवी दिल्ली – कोरोनाच्या संकटात अनेक कंपन्यांसह वित्तीय संस्थांमध्ये कर्मचारी कपात झाली आहे. असे असले तरी स्टेट बँक ऑफ इंडियात तुलनेने कमी कर्मचारी कपात व वेतन कपात होणार असल्याचे या बँकेचे चेअरमन रजनीश कुमार यांनी समभागधारकांना (शेअरहोल्डर) सांगितले.
स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन रजनीश कुमार यांनी बँकेच्या वार्षिक अहवालात समभागधारकांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी सरकार व सरकारकडून मदत मिळणाऱ्या विविध क्षेत्रांकडून मोठा व्यवसाय मिळत असल्याचे सांगितले. आर्थिक आव्हाने असतानाही देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने वर्ष 2019-20 मध्ये चांगली कामगिरी केली आहे. चालू आर्थिक वर्षातही बँक चांगली कामगिरी करेल, असा विश्वास रजनीश कुमार यांनी व्यक्त केला.