नवी दिल्ली - व्यवसायात मोठी वृद्धी झाल्याने एलआयसीचा विमा बाजारातील हिस्सा ७४ टक्क्यापर्यंत झाला आहे. तर इतर २६ टक्के हिस्सा हा उर्वरित २३ खासगी विमा कंपन्यांचा आहे. जूनमध्ये एलआयसीच्या १३.३२ लाख विम्यांची विक्री झाली. त्यातून केवळ एकाच महिन्यातून एलआयसीला २५ हजार कोटी रुपये मिळाले आहेत.
एलआयसीने एकाच महिन्यात मिळविले २५ हजार कोटी, जूनमध्ये १३.३२ लाख पॉलिसींची विक्रमी विक्री - जीवन विमा निगम
एलआयसी ही देशातील सर्वात मोठी व एकमेव सरकारी जीवन विमा कंपनी आहे. एलआयसीने चालू वर्षात जूनमध्ये २६ हजार ३०.१६ कोटी रुपयांचा विमा मिळविला.
एलआयसी ही देशातील सर्वात मोठी व एकमेव सरकारी जीवन विमा कंपनी आहे. विमा नियामक आणि प्राधिकरण विकासच्या (आयआरडीए) आकडेवारीनुसार गतवर्षी जूनमध्ये एलआयसीला न्यू प्रिमिअम एकूण १६,६११,५७ कोटी रुपये मिळाले आहेत. तर एलआयसीने चालू वर्षात जूनमध्ये २६ हजार ३०.१६ कोटी रुपयांचा नवा विमा हप्ता मिळविला. देशातील सर्व विमा कंपन्यांना मिळणाऱ्या न्यू प्रिमिअममध्ये (नवा हप्ता) जूनमध्ये ९४ टक्क्यापर्यंत वाढ झाली आहे. हा नवा विमा हप्ता एकूण ३२ हजार २४१.३३ कोटींचा आहे.
खासगी विमा कंपन्यांच्या व्यवसायात १४.१० टक्क्यांची वाढ झाली आहे. खासगी कंपन्यांना मिळणारा नवा विमा हप्ता जूनमध्ये ६ हजार २११.१७ कोटी एवढा मिळाला आहे. गतवर्षी याच कालावधीत खासगी कंपन्यांना ५ हजार ४४३.७५ कोटींचा नवा विमा हप्ता मिळाला होता. खासगी २४ विमा कंपन्यांना एप्रिल-जूनमध्ये मिळणाऱ्या नव्या विमा हप्त्यात ६५ टक्क्यांची वाढ झाली आहे.