नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी जीवनविमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) २ टक्के हिस्सा खुल्या बाजारात विकला आहे.
एलआयसीने १३.०८ कोटी शेअर हे आयसीआयसीआय बँकेला विकले आहेत. हा एलआयसीमधील २.००२ टक्के हिस्सा आहे. ही माहिती एलआयसीने शेअर बाजाराला दिली आहे. हिस्सा विकल्याने एलआयसीचा कंपनीमधील हिस्सा ८.७४ टक्क्यांवरून ६.७४ टक्के झाला आहे. शेअर बाजारात आयसीआयसीआय बँकेचे शेअर १.२८ टक्क्यांनी वधारून ५२०.२० रुपये आहे.
संबंधित बातमी वाचा-विरोधकांनी एलआयसीचे खासगीकरण रोखावे, कामगार नेत्यांची मागणी
एलआयसीची १९५६ मध्ये स्थापना झाली. एलआयसीकडून ग्रामीण भागासह सामाजिक आणि आर्थिक दुर्बल घटकांना वाजवी दरात जीवनविमा देण्यात येतो.देशाला प्राधान्य आणि वाजवी दरात विमाधारकांना परतावा देणे, यासाठी एलआयसीने गुंतवणूक केली आहे. एलआयसीने ३१ मार्च २०१९ पर्यंत २९ लाख ८४ हजार ३३१ कोटींची गुंतवणूक केली आहे. जर निर्गुंतवणूक करण्यात आली तर त्याचा परिणाम विमाधारकांना होणार आहे.