महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

जगातील पहिला कस्टमाईज्ड स्मार्टफोन लावाकडून लाँच - Sunil Raina on Smartphone

लावाने कस्टमाईज्ड स्मार्टफोन हा मायझेड या ब्रँडने लाँच केला आहे. हा स्मार्टफोन ग्राहकांना ११ जानेवारीपासून खरेदी करता येणार असल्याचे लावा इंटरनॅशनलचे अध्यक्ष सुनील रैना यांनी जाहीर केले.

लावा इंटरनॅशनल
लावा इंटरनॅशनल

By

Published : Jan 7, 2021, 3:57 PM IST

नवी दिल्ली - लावा इंटरनॅशनलने जगातील पहिला वैयक्तीकरण (कस्टमाईज्ड) स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये ग्राहक त्यांना हवा तसा कॅमेरा, मेमोरी, स्टोअरेज क्षमता आणि रंग निवडू शकतात.

लावाने कस्टमाईज्ड स्मार्टफोन हा मायझेड या ब्रँडने लाँच केला आहे. हा स्मार्टफोन ग्राहकांना ११ जानेवारीपासून खरेदी करता येणार असल्याचे लावा इंटरनॅशनलचे अध्यक्ष सुनील रैना यांनी जाहीर केले. जगातील पहिला कस्टमाईज्ड स्मार्टफोनमध्ये कॅमेरा, रॅम, आरओएम आणि रंग अशा ६६ कॉम्बिनेशन मिळतात. त्यामध्ये ग्राहकांना हवे ते निवडण्याचा पर्याय देण्यात येतो. गरजेप्रमाणे ग्राहकांना स्मार्टफोन अपग्रेड आणि कस्टमाईज्ड करता येत असल्याचे रैना यांनी सांगितले.

हेही वाचा-'जागतिक बँकेचा विकासदर चालू वर्षात ४ टक्क्यांनी वाढेल'

  • कंपनीने नोकियासारख्या कंपन्यांसाठी आजवर मोबाईलचे सुट्टे भाग तयार केले आहेत. ग्राहक स्मार्टफोनचे कमी कॉन्फिगरेशन ते उच्च कॉन्फिगरेशन हवे तसे निवडू शकतात. या संपूर्ण कार्यक्रमासाठी भारतीय बुद्धिमत्तेचा वापर करण्यात आला आहे.
  • नवीन उत्पादने दाखल केल्यानंतर कंपनीला बाजारात ५ टक्के हिस्सा मिळेल, अशी अपेक्षा आहे.
  • नव्या उत्पादनात कंपनीने झेड१ हा स्मार्टफोन लाँच केला. त्यामध्ये २ जीबी रॅम आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ प्रोटेक्शन आहे. त्यासोबत संरक्षण दर्जाचे प्रमाणपत्र आहे. या स्मार्टफोनची किंमत ५,४९९ रुपये आहे.
  • कंपनीने झे२, झेड४ आणि झेड६ बिल्ट मेडियाटेक ओक्टा कोअर प्रोससर आहे. त्यामध्ये ५,००० एमएएच बॅटरी आहे.
  • या स्मार्टफोनची किंमत ६,९९९ ते ९,९९९ रुपये आहे. मायझेडसह झेड२, झेड४ आणि झेड६ हे स्मार्टफोन ११ जानेवारीपासून ऑनलाईन आणि दुकानांमध्ये उपलब्ध होणार आहेत.

हेही वाचा-मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांची दिल्लीकडे कूच, म्हणाले...

केंद्र सरकारने देशात स्मार्टफोनची निर्मिती वाढविण्यासाठी उत्पादनावर आधारित सवलत योजना जाहीर केले आहे. या योजनेत लावा कंपनी ही पात्र ठरली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details