कुवेत शहर – खनिज तेलाने समृद्ध असूनही कुवेत देशापुढे मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. कुवेतला सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन देणे कठीण झाले आहे. या देशाच्या खजिन्यात केवळ 6.6 अब्ज डॉलर असल्याचा इशारा अर्थमंत्री बराक-अल-शीतान यांनी दिला आहे.
देशातील अपुऱ्या चलनाच्या समस्येवर मात करण्यासाठी नोव्हेंबरनंतर आमच्याकडे पैसे नाहीत, असे कुवतेचे अर्थमंत्री बराक-अल-शीतान यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, की खनिज तेलाच्या किमती वाढल्या नाही तर सध्या असलेल्या पैशांचा वापर सुरू राहणार आहे. हे पैसे जनरल रिझर्व्ह फंडमधून काढण्यात येत आहे. हे पैस खर्च होत असल्याची अगतिकता अर्थमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.