महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

जाणून घ्या, रेल्वेने प्रवास करण्यापूर्वी महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना - Indian railways guidelines for passengers

रेल्वे विभागाने आठवडाभरापूर्वी १ जूनपासून २०० रेल्वे धावणार असल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये संपर्क क्रांती, जन शताब्दी आणि पूर्वा एक्सप्रेस आदी रेल्वेचा समावेश आहे. यापूर्वीच रेल्वेने स्थलांतरित मजुरांसाठी श्रमिक रेल्वे सुरू केल्या आहेत.

संग्रहित - रेल्वे प्रवास
संग्रहित - रेल्वे प्रवास

By

Published : May 24, 2020, 5:42 PM IST

Updated : May 24, 2020, 8:36 PM IST

नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात 1 जूनपासून होणाऱ्या रेल्वेचा प्रवास करणाऱ्यांना काही नियमांचे पालन करावे लागणार आहे. रेल्वे स्थानकावर प्रवाशांना थर्मल स्क्रीनिंग करावे लागणार आहे. तर प्रवाशांना आरोग्य सेतू अ‌ॅप डाऊनलोड करण्याचा आरोग्य मंत्रालयाने सल्लाही दिला आहे.

रेल्वे विभागाने आठवडाभरापूर्वी 1 जूनपासून 200 रेल्वे धावणार असल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये संपर्क क्रांती, जन शताब्दी आणि पूर्वा एक्स्प्रेस आदी रेल्वेचा समावेश आहे. यापूर्वीच रेल्वेने स्थलांतरित मजुरांसाठी श्रमिक रेल्वे सुरू केल्या आहेत. यापुढे कोरोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीने रेल्वेमध्ये पांघरून व पडदे अशा सुविधा देण्यात येणार नाहीत.

रेल्वे प्रवाशांकरिता महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना

प्रवाशांना आयआरसीटीसी वेबसाईट, सामाईक सुविधा केंद्र आणि तिकिट एजंटकडून रेल्वेचे तिकिटे घेता येणार आहेत.

रेल्वे प्रवाशांकरिता महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना

रेल्वेने 22 मे रोजीपासून टप्प्याटप्प्याने तिकिट खिडक्या सुरू केल्या आहेत. केवळ ज्यांचे तिकिट आरक्षित होईल, अशा व्यक्तींनाच रेल्वे स्थानकावर प्रवेश दिला जाणार आहे. रेल्वे स्थानकावर आलेल्या प्रवाशांना आरोग्याच्या आचारसंहितेचे कठोरपणे पालन करावे लागणार आहे.

रेल्वे प्रवाशांकरिता महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना

हेही वाचा-कोरोनाचा परिणाम; नोकरीच्या शोधात असलेले म्हणतात.. घरूनच काम हवे!

अशी असणार रेल्वेची सेवा -

  1. रेल्वेतील वातानुकुलीत (एसी) डबे, बिगर वातानुकुलित डबे आणि जनरल डबे पूर्णपणे आरक्षित असणार आहेत.
  2. जनरल डबे, आरक्षित आणि द्वितीय श्रेणीतल डब्यांसाठी नेहमीप्रमाणेच सामान्य दर राहणार आहे.
  3. रेल्वेत कोणताही डबा बिगर आरक्षित नसेल.
  4. श्रमिक विशेष रेल्वे राज्यांच्या सहकार्याने सुरुच राहणार आहेत.
  5. इतर प्रवासी रेल्वे, एक्सप्रेस आणि उपनगरांमधील रेल्वेच्या सेवा स्थगित राहणार आहेत.
  6. रेल्वेमध्ये शक्य तेवढ्या रेल्वे स्थानकात प्रवेश आणि बाहेर पडण्याचे गेट स्वतंत्र असणार आहेत.
  7. शारीरिक अंतर दूर राखण्याच्या मार्गदर्शक सूचना, सुरक्षितता आणि आरोग्याच्या आचारसंहिता हे सर्व प्रवाशांना पाळावे लागणार आहेत.
  8. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूचनेप्रमाणे ज्यांचे रेल्वे तिकिट आरक्षित झाले आहे, अशा व्यक्तींनाच रेल्वे स्थानकांमध्ये वाहन आणण्याची परवानगी असणार आहे.
  9. जास्तीत जास्त 30 दिवसांपूर्वी रेल्वेचे तिकीट आरक्षित करता येणार आहे.
  10. रेल्वे तिकीट आरक्षणाची यादी ही टाळेबंदीनंतर तयार करण्यात येणार आहे.
  11. ज्यांचे आरक्षण प्रतिक्षा यादीत आहे, त्यांना रेल्वेत परवानगी मिळणार नाही.
  12. रेल्वे बिगर आरक्षित तिकीटे देणार नाही. तसेच रेल्वेतही तिकीटे दिली जाणार नाहीत.
  13. तात्काळ आणि प्रिमियम तात्काळ तिकीटाचे आरक्षण रेल्वेकडून दिले जाणार नाही.
  14. रेल्वेचा चार्ट हा रेल्वे निघण्यापूर्वी कमीत कमी चार तासापूर्वी तयार होणार आहे.

हेही वाचा-मारुतीच्या मनेसर कारखान्यातील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

Last Updated : May 24, 2020, 8:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details