अमरावती - कोरियन ऑटो कंपनी किया मोटर्स ही देशात उत्पादन घेतलेले पहिले मॉडेल लाँच करणार आहे. हे लाँचिंग आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांच्याहस्ते ८ ऑगस्टला होण्याची शक्यता आहे.
किया मोटर्सची देशातील पहिली 'मेड इन इंडिया' चारचाकी ८ ऑगस्टला होणार लाँच - carl launch
किया मोटर्सचा देशातील पहिला उत्पादन प्रकल्प हा अनंतपुरमू जिल्ह्यातील पेनुकोंडा येथील ५३६ एकरमध्ये कार्यान्वित करण्यात आला आहे.
किया कंपनी ८ ऑगस्टला चारचाकी लाँचिग करण्यासाठी तयारी करत आहे. लाँचिग करण्यासाठी मुख्यमंत्री वाय.एस.जगन मोहन रेड्डी यांना निमंत्रित करण्यात आल्याचे आंध्रप्रदेश मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे. किया मोटर्सचा देशातील पहिला उत्पादन प्रकल्प हा अनंतपुरमू जिल्ह्यातील पेनुकोंडा येथील ५३६ एकरमध्ये कार्यान्वित करण्यात आला आहे.
किया कंपनीने आंध्रप्रदेश सरकारबरोबर एप्रिल २०१७ मध्ये सामंजस्य करार केला आहे. त्यासाठी कंपनीने १.१ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. या उत्पादन प्रकल्पामधून दरवर्षी ३ लाख कार करण्याची क्षमता आहे. प्रायोगिकतत्वावर जानेवारीमध्ये चारचाकी उत्पादन घेण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये रोबोटिक्स, कृत्रिम मानवी बुद्धिमत्ता अशा अद्ययावत तंत्रज्ञानाचा समावेश आहे. स्वयंचलित उत्पादन करण्याची सुविधा तसेच ३०० रोबोट्स ऑटोमेटिंग प्रेस, बॉडी आणि पेंटची सेवा आहे.