भुवनेश्वर - कंधमाल हळद ही ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांकडून तयार केली जाते. या हळदीला सोमवारी भौगोलिक निर्देशांकाची (जीआय) नवी ओळख मिळाली आहे. याबाबतची माहिती ओडिशातील भौगोलिक ओळख नोंदणी कार्यालयातील बौद्धिक संपदाचे प्रमुख डॉ. एस. के. कार यांनी दिली.
ओडिशा : औषधी गुणधर्मांच्या कंधमाल हळदीला मिळाला भौगोलिक निर्देशांक, 'कसम'च्या प्रयत्नाला यश - KASAM
सेंद्रिय पद्धतीने कंधमाल हळदीचे ६० हजारांहून अधिक कुटुंबांकडून उत्पादन घेतले जाते. कमी जोखीम, अधिक उत्पादन आणि पर्यावरणपूरक अशा पद्धतीने कंधमाल हळदीचे उत्पादन घेतले जाते. विशेष म्हणजे प्रतिकूल वातावरणातही ही हळद तग धरू शकते

ओडिशामधील कंधमाल हळद ही औषधी गुणधर्मामुळे प्रसिद्ध आहे. डिसेंबर २०१८ मध्ये कंधमालमधील फुलबणी येथील अपेक्स स्पाईसेस असोसिएशन फॉर मार्केटिंगने (केएएसएएम-कसम) हळदीची जीआयसाठी नोंदणी केली. कसम या संस्थेचे सुमारे १८ हजार नोंदणीकृत सदस्य आहेत. या संस्थेचे अध्यक्ष कंधमाल जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. डी. वृंदा आहेत.
ही आहेत हळदीचे वैशिष्ट्ये-
सेंद्रिय पद्धतीने कंधमाल हळदीचे ६० हजारांहून अधिक कुटुंबांकडून उत्पादन घेतले जाते. कमी जोखीम, अधिक उत्पादन आणि पर्यावरणपूरक अशा पद्धतीने कंधमाल हळदीचे उत्पादन घेतले जाते. विशेष म्हणजे प्रतिकूल वातावरणातही ही हळद तग धरू शकते. परिसरातील गोळा करण्यात आलेल्या हळदीच्या नमुन्यांचे वैज्ञानिक आणि तांत्रिक परीक्षण करण्यात आले. यामध्ये कंधमाल हळदीमध्ये अनेक विशेष वैद्यकीय गुणधर्म असल्याचे आढळून आले. त्याचा वैद्यकीय आणि औद्योगिक कामांसाठी वापर करणे शक्य असल्याचे कार यांनी म्हटले. या हळदीचा रंग सोनेरी पिवळा आहे. जीआय मिळाल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे हितसंरक्षण शक्य होईल, असेही कार यांनी म्हटले.
काय आहे भौगोलिक निर्देशांक (Global Indication)-
विशिष्ट अशा भौगोलिक क्षेत्रातील उत्पादनांना जीआयची ओळख दिली जाते. ही त्या भौगोलिक प्रदेश विशेष ओळख व प्रतिष्ठा असते. त्या प्रदेशाहून इतर क्षेत्रात उत्पादन घेतल्यास मुळ उत्पादनातून ते भिन्न असल्याचे दिसून येते. यामध्ये विशेषत: कृषी उत्पादने, औद्योगिक उत्पादने, हातमागाची उत्पादने, वाईन आदींचा समावेश आहे.