महाराष्ट्र

maharashtra

घरांच्या खरेदीत घसरण; ‘हे’ आहे प्रमुख कारण

By

Published : Jul 29, 2020, 8:42 PM IST

घर खरेदीबाबत जेएलएल कंपनीकडून ग्राहकांचे सर्वेक्षण करण्यात आले. कोरोनाच्या संकटाने रोजगाराची नाजूक स्थिती झाली असताना ग्राहकांनी घर खरेदीचे प्राधान्य बदलल्याचे सर्वेक्षणामधून दिसून आले आहे.

संग्रहित
संग्रहित

नवी दिल्ली – कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटात देशात कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात वेतन कपात आणि कर्मचारी कपात होत आहे. त्यामुळे नोकऱ्यांबाबत असुरक्षितता निर्माण झाली आहे. याच कारणामुळे घर खरेदीच्या मागणीत घसरण झाल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले आहे.

घर खरेदीबाबत जेएलएल कंपनीकडून ग्राहकांचे सर्वेक्षण करण्यात आले. कोरोनाच्या संकटाने रोजगाराची नाजूक स्थिती झाली असताना ग्राहकांनी घर खरेदीचे प्राधान्य बदलल्याचे सर्वेक्षणामधून दिसून आले आहे. ग्राहकांनी आर्थिक मंदी असताना तग धरून राहण्याला प्राधान्य दिले आहे.

घर खरेदी करणार ग्राहक हे नोकरीमधील सुरक्षितता आणि वेतन कपातीबाबत चिंतेत आहेत. त्याचा ग्राहकांच्या भावनांवर मोठा परिणाम झाल्याचे सर्वेक्षणात दिसून आले. भविष्यात घर खरेदी करणाऱ्यांच्या संख्येतही घसरण झाली आहे. घरांच्या मागणीत वाढ झाली आहे. मात्र आर्थिक स्थिरता आणि नोकऱ्यांमध्ये सुरक्षितता निर्माण झाल्याशिवाय घरांच्या मागणीचे विक्रीत रुपांतरण होणार नसल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे.

सर्वेक्षणामध्ये घर विकत घ्यायचे की भाड्याने असा प्रश्न विचारला असता 91 टक्के लोकांनी घर खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. तर 67 टक्के लोकांनी घर खरेदी करणे ही चैनीची नसून गरजेची गोष्ट असल्याचे म्हटले आहे. जेएलएलचे सीईओ रमेश नायर म्हणाले, की रहिवासी घरांच्या मागणीत वाढ हे सुधारणांचे हिरवे कोंब आहेत. पहिल्यांदा परवडणाऱ्या दरातील घरांच्या मागणीत वाढ होणार आहे. तर येत्या सहा महिन्यांत 50 टक्के ग्राहकांनी घर खरेदी करण्याची तयारी असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे.

दरम्यान, कोरोनाच्या संकटाने घरांच्या विक्रीत देशात 50 टक्क्यांहून अधिक घसरण झाल्याचे विविध सर्वेक्षणातून दिसून आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details