नवी दिल्ली- कोरोना महामारीचे संकट ओढवले असताना ५ पैकी ४ भारतीयांना नोकरी गमाविण्याची भीती आहे. ही माहिती सर्व्हेमधून समोर आली आहे. कोरोनाच्या धसक्याने देशातील अनेक उद्योग आणि व्यवसाय ठप्प झाले आहेत.
इंटरनेटवर आधारित असलेल्या बाजारपेठ संशोधन आणि डाटा अॅनालिटिक्सची सेवा देणाऱ्या युगव्ह संस्थेने नागरिकांचे सर्वेक्षण केले. यामध्ये कोरोनामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या चिंतेवर प्रश्न विचारण्यात आले. या सर्वेक्षणानुसार २० टक्के नागरिकांना नोकऱ्या गमाविण्याची चिंता वाटत आहे. तर १६ टक्के लोकांना वेतन कपातीची भीती आहे. तर ८ टक्के लोकांना चालू वर्षात बोनस आणि वेतनवाढ न होण्याची भीती आहे.