महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 14, 2020, 7:49 PM IST

ETV Bharat / business

...तर सराफा व्यावसायिकांना तुरुगांची हवा खावी लागणार

सोन्याच्या दागिन्यांना १५ जानेवारी २०२१ पासून हॉलमार्किंग करणे बंधनकारक असल्याची अधिसूचना केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने काढली आहे.

Ramvilas Paswan in Meeting
रामविलास पासवान बैठकीत बोलताना

नवी दिल्ली- सराफा व्यवसायिकांना भारतीय प्रमाणी मानांकनाकडे नोंदणी करण्यासाठी एक वर्षाचा अवधी दिला आहे. तसेच त्यांना सोन्याच्या दागिन्यांच्या हॉलमार्किंग करण्याची १ वर्षानंतर अंमलबजावणी करावी लागणार आहे. या नियमांचा भंग केल्यास सराफांना दंड आणि एक वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार असल्याचे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले.


सोन्याच्या दागिन्यांना १५ जानेवारी २०२१ पासून हॉलमार्किंग करणे बंधनकारक असल्याची अधिसूचना केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने काढली आहे. सोन्याच्या खात्रीशीर शुद्धतेसाठी नियम करण्यात आल्याचे आल्याचे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी माध्यमांना सांगितले. पासवान म्हणाले, सराफा हे केवळ हॉलमार्क असलेले सोन्याचे दागिने १५ जानेवारी २०२१ पासून विकू शकणार आहेत. तर सोन्याचे दागिने केवळ १४,१८, आणि २२ कॅरटमध्ये विकता येणार आहेत.

हेही वाचा-आयात कांद्याने वाढविली केंद्र सरकारची चिंता, कारण...

काय असणार हॉलमार्कमध्ये?
सोन्यावरील हॉलमार्कमध्ये बीआयएसचा शिक्का, कॅरेटची शुद्धता, शुद्धतेची नोंदणी केलेले केंद्र आणि सराफाची विशिष्ट ओळख यांचा हॉलमार्कमध्ये समावेश आहे.

हेही वाचा-महागाईबाबत विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलवा; काँग्रेसची पंतप्रधानांकडे मागणी

काय आहे सोन्याचे हॉलमार्किंग?
सोन्याची हॉलमार्किंग हे शुद्धतेचे प्रमाणपत्र आहे. सध्या हे हॉलमार्किंग घेणे सराफांना ऐच्छिक आहे. भारतीय प्रमाणित मानांकन (बीआयएस) एप्रिल २००० पासून हॉलमार्किंग देण्याची योजना देत आहे. मात्र, देशातील केवळ ४० टक्के सोन्याच्या दागिन्यांना हॉलमार्क आहे. सध्या सोन्याचे दागिने हे १० श्रेणीत आहेत. तर १५ जानेवारी २०२१ नंतर हॉलमार्कचे दागिने केवळ १४ कॅरट, १८ कॅरट आणि २२ कॅरेटमध्ये उपलब्ध असणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details