हैदराबाद- अॅमेझॉनचे संस्थापक आणि सीईओ जेफ बेझोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. कोरोना महामारीत अॅमेझॉनचे शेअर वाढल्यानंतर जेफ यांची एकूण संपत्ती २०२ अब्ज डॉलर झाली आहे.
जेफ बेझोस ठरले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; एकूण संपत्ती २०० अब्ज डॉलरहून अधिक - Latest Jeff bezos news
जेफ बेझोस यांची १ जानेवारी २०२० ला केवळ ११५ अब्ज संपत्ती होती. त्यानंतर कंपनीचे शेअर ८० टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. कोरोना महामारीत कंपनीचा व्यवसाय वाढला आहे. त्यामुळे जेफ बेझोस यांच्या संपत्तीत अभूतपूर्व अशी वाढ झाली आहे.
संपत्तीत जेफ बेझोस यांनी मैलाचा दगड ओलांडल्याचे फोर्ब्सने म्हटले आहे. अमेरिकेच्या शेअर बाजारात अॅमेझॉनचे शेअर २ टक्क्यांनी वधारले आहेत. त्यानंतर बेझोस यांच्या संपत्तीत ४.९ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. बेझोस यांचा ई-कॉर्मसमध्ये आघाडीवर असलेल्या अॅमेझॉनमध्ये ११ टक्के हिस्सा आहे. याशिवाय कंपनीचा वॉशिंग्टन पोस्ट वर्तमानपत्र, एअरोस्पेस कंपनी ब्ल्यू ओरिजन अशा कंपन्यांमध्ये वैयक्तिक गुंतवणूक आहे.
जेफ बेझोस यांची १ जानेवारी २०२० ला केवळ ११५ अब्ज संपत्ती होती. त्यानंतर कंपनीचे शेअर ८० टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. कोरोना महामारीत कंपनीचा व्यवसाय वाढला आहे. त्यामुळे जेफ बेझोस यांच्या संपत्तीत अभूतपूर्व अशी वाढ झाली आहे. जेफ बेझोस यांच्यानंतर १२४ अब्ज डॉलरची संपत्ती असलेले बिल गेट्स हे जगातील सर्वात श्रीमंताच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत.