महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

फोर्ब्जच्या 'सर्वात श्रीमंत ८० महिलांच्या' यादीत मूळ भारतीय वंशाच्या तिघींचा समावेश - नेहा नारखेडे

फोर्ब्सने अमेरिकाज रिचेस्ट सेल्फ मेड वूमेन २०१९ नावाने यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये कॉम्प्युटर नेटवर्किंग फर्म अरिस्टा नेटवर्कसच्या अध्यक्षा आणि सीईओ जयश्री उल्लाल, सिंटेलच्या सहसंस्थापक नीरजा सेठी यांचा यादीत समावेश आहे. त्याचबरोबर स्ट्रीमिंग डाटा टेक्नॉलॉजी कंपनी कॉन्फ्लूएंटच्या सहसंस्थापक नेहा नारखेडे यांचादेखील यादीत समावेश आहे.

जयश्री उल्लाल, नेहा नारखेडे

By

Published : Jun 7, 2019, 5:55 PM IST

न्यूयॉर्क - भारतीय महिला केवळ देशातच नव्हेतर विदेशातही यशाची पताका फडकवित आहेत. मूळ भारतीय वंशाच्या असलेल्या तीन उद्योजक महिलांनी फोर्ब्सच्या 'सर्वात श्रीमंत ८० स्वयंसिद्ध' यादीत स्थान पटकाविले आहे. या महिलांनी स्वत:च्या कर्तृत्वावर विविध उद्योगात उत्तुंग यश मिळविले आहे.


फोर्ब्सने अमेरिकाज रिचेस्ट सेल्फ मेड वूमेन २०१९ नावाने यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये कॉम्प्युटर नेटवर्किंग फर्म अरिस्टा नेटवर्कसच्या अध्यक्षा आणि सीईओ जयश्री उल्लाल, सिंटेलच्या सहसंस्थापक नीरजा सेठी यांचा यादीत समावेश आहे. त्याचबरोबर स्ट्रीमिंग डाटा टेक्नॉलॉजी कंपनी कॉन्फ्लूएंटच्या सहसंस्थापक नेहा नारखेडे यांचादेखील यादीत समावेश आहे.

एबीसी सप्लायच्या अध्यक्षा डायन हेंड्रीक्स या पहिल्या क्रमांकावर आहेत. ही कंपनी छते, खिडकी आणि स्लायडिंगची अमेरिकेतील सर्वात मोठी घाऊक पुरवठादार आहे.

या यादीत आहेत मूळ भारतीय वंशाच्या महिल्या-
५८ वर्षीय उल्लाल यांचा यादीत १८ वा क्रमांक आहे. त्यांच्याकडे १.४ अब्ज डॉलरची संपत्ती आहे. त्यांच्याकडे अरिस्टाचे ५ टक्के शेअर आहेत.

सेठी यांचा २३ वा क्रमांक आहे. त्यांनी पती भारत देसाई यांच्यासमेवत सिंटलेची १९८० मध्ये स्थापना केली. सुरुवातीला त्यांनी केवळ २ हजार डॉलरची कंपनीत गुंतवणूक केली होती. सध्या त्यांची सपंत्ती ही १ बिलियन डॉलर आहे. सिंटेलने फ्रेंच आयटी कंपनी अॅटोस एसईही ३.४ अब्ज डॉलरला विकत घेतली आहे. ६४ वर्षीय सेठी यांच्याकडे सुमारे ५१० मिलियन डॉलरची संपत्ती आहे.

नारखेडे यांचा यादीत ६० वा क्रमांक आहे. त्यांची संपत्ती ३६ कोटी डॉलरची आहे. कॉनफ्लूएन्टचे बाजारमुल्य हे २.५ अब्ज डॉलर आहे. या कंपनीचे गोल्डमॅन, नेटफ्लिक्स आणि उबेर हे ग्राहक आहेत. नारखेडे या ३४ वर्षाच्या असून त्या लिंकडिनमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी लिंकडिनच्या दोन सहकाऱ्यांसमवेत कॉनफ्लूएंटची स्थापना केली. या कंपनीची उत्पादने अॅपाचे कॅफकासह इतर कंपन्या वापरत आहेत.

अधिकाधिक महिला नवे व्यवसाय सुरू करत आहेत. त्यामुळे अमेरिकेतील स्वयंसिद्ध महिलांची संख्या वाढत असल्याचे फोर्ब्सने म्हटले आहे. सध्याच्या तुलनेत गतवर्षी श्रीमंत महिलांच्या यादीत केवळ एक तृतीयांश महिला होत्या, याकडे फोर्ब्सने लक्ष वेधले आहे.


८० श्रीमंतापैकी १९ महिला या मूळच्या इतर देशातील आहेत-
यादीतील महिलांचे वय २१ ते ९२ वर्ष आहे. त्यांच्या संपत्तीचे मूल्य एकूण ८१.३ अब्ज डॉलर एवढे आहे. श्रीमंत असलेल्या ३८ महिल्या कॅलिफॉर्नियात राहतात. तर न्यूयॉर्कमध्ये ९ महिला राहतात. तर १९ महिला या अमेरिकेबाहेरील असल्याचे फोर्ब्सने म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details