महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

जॅक मा बेपत्ता झाल्याने भारतीय कंपन्यांना बसणार फटका

अलिबाबा ग्रुपने चीन-भारतामधील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशातील गुंतवणुकीचे निर्णय थांबविले होते. त्यानंतर अचानक जॅक मा बेपत्ता झाले आहेत.

जॅक मा
जॅक मा

By

Published : Jan 4, 2021, 10:23 PM IST

नवी दिल्ली -अलिबाबा ग्रुपचे संस्थापक जॅक मा हे ऑगस्टपासून बेपत्ता झाले आहेत. त्याचा भारतामधील काही डिजीटल कंपन्यांवर परिणाम होणार आहे.

अलिबाबा ग्रुपने चीन-भारतामधील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशातील गुंतवणुकीचे निर्णय थांबविले होते. त्यानंतर अचानक जॅक मा बेपत्ता झाले आहेत. अमेरिकेची कंपनी पिचबुकच्या माहितीनुसार अलिबाबा आणि अलिबाबा कॅपिटल पार्टनर आणि अँट ग्रुपने भारतीय कंपन्यांत २ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे.

हेही वाचा-लसीची किंमत सरकारसाठी २१९ ते २९२ रुपये-आदार पुनावाला

अलिबाबाची भारतीय कंपन्यांमध्ये गुंतवणूक-

अलिबाबाने भारतामधील झोमॅटो आणि बिगबास्कटेमध्ये गुंतवणूक केली आहे. झोमॅटोला अँट फायनान्शियलकडून १५० दशलक्ष डॉलर मिळाले आहेत. चीनची सरकारी बँक पिपल्स बँक ऑफ चायनाने अँट ग्रुपला नियमभंग केल्याप्रकरणी २६ डिसेंबरला नोटीस पाठविली होती. अलिबाबाने चीनमधील बाजारात वर्चस्व निर्माण करण्यासाठी नियमांचे उल्लंघन केल्याने चिनी सरकारकडून अलिबाबा ग्रुपची चौकशी सुरू होती.

हेही वाचा-बजाज ऑटोच्या वाहन विक्रीत डिसेंबरमध्ये ११ टक्क्यांनी वाढ

अलिबाबा ग्रुपची कोरोनाच्या काळात अनेक देशांना मदत-

दरम्यान, जॅक मा यांनी चीनच्या सरकारी बँकेच्या धोरणावर जाहीर टीका केली होती. चीनमध्ये सरकारविरोधात टीका करणाऱ्यांना यापूर्वी कठोर शिक्षा देण्यात आल्याचे अनेकदा पहायला मिळाले आहे. अलिबाबा ग्रुपचे संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य जॅक मा यांनी एप्रिल महिन्यात न्यूयॉर्कला १ हजार व्हेंटीलेटरची मदत केली होती. मा यांच्याच एका संस्थेने आफ्रिका, लॅटीन अमेरिका आणि आशियातील देशांमध्ये व्हेंटीलेटर, मास्क आणि इतर मदत पोहोचवली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details