नवी दिल्ली- देशात कोरोनाविरोधात लढण्यासाठी लशींची पुरेशी निर्मिती होत नसताना दिलासादायक बातमी आहे. जॉन्सन अँड जॉन्सनची एकवेळचा डोस असलेली लस भारतात लवकरच येणार आहे. त्यापूर्वी कंपनीने भारतीय औषधी महानियंत्रकांकडे (आयडीजी) तिसऱ्या टप्प्यातील चाचणी घेण्यासाठी परवानगी मागितली आहे. तसेच लस आयात करण्यासाठीही परवाना मागितली आहे.
केंद्रीय औषधी मानांकन संस्थेत (सीडीएससीओ) कोरोनाविरोधातील लशीच्या परवान्यासाठी कोरोनाविषयीची खास तज्ज्ञ समिती आहे. या समितीबरोबर बैठक व्हावी, असे जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने म्हटले आहे. केंद्र सरकारने आठवडाभरापूर्वीच अमेरिका, युरोप, इंग्लंड, जपान आणि जागतिक आरोग्य संघटनेने परवाना दिलेल्या कोरोना लशींना आपत्कालीन मंजुरी दिली आहे. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला तांत्रिक कारणाने आज दुसऱ्यांदा भारतीय औषधी महानियंत्रकांकडे चाचणी घेण्यासाठी अर्ज करावा लागला आहे.
हेही वाचा-लॉजमधील हाय-प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, ८ तरुणींसह १० जणांना अटक
१ मेपासून १८ वर्षांवरील सर्व पात्र व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लस