मुंबई - प्राप्तिकर विभागाने देशाच्या आर्थिक राजधानीत ४० मालमत्तांवर छापे मारले आहेत. या मालमत्ता बड्या बांधकाम विकसकाच्या आहेत. त्याने सुमारे ७०० कोटींची कर चुकवेगिरी केल्याचा प्राप्तिकर विभागाला संशय आहे. हे छापे गेल्या पाच दिवसांपासून मारण्यात आले आहेत.
मुंबईमधील बड्या बांधकाम विकासकाच्या ४० मालमत्तांवर प्राप्तिकर विभागाचे छापे - प्राप्तिकर विभाग
प्राप्तिकर विभागाने छापे मारण्यात आलेल्या ग्रुपची माहिती अद्याप जाहीर केलेली नाही. कर चुकवेगिरीबाबत प्राप्तिकर विभागाकडून तपास सुरू आहे.
प्राप्तिकर विभागाला असुरक्षित बोगस कर्ज प्रकरणे व बनावट पैसे हस्तांतरणाची पुरावेही आढळून आली आहेत. १०० कोटींच्या व्यावसायिक आणि रहिवासी मालमत्ता विकल्याच्या पावत्या आढळून आल्या आहेत. तसेच ५२५ कोटींची कर चुकवेगिरी करण्यासाठी खात्यात फेरफार करण्याचे तपासामधून दिसून आले आहेत. प्राप्तिकर विभागाला छाप्यात १४ कोटींचे मौल्यवान दागिने आढळून आली आहेत.
ग्रुपच्या प्रवर्तकांनी आर्थिक फायदा मिळविण्यासाठी हवाला चालकांचाही वापर केला आहे. प्राप्तिकर विभागाने छापे मारण्यात आलेल्या ग्रुपची माहिती अद्याप जाहीर केलेली नाही. कर चुकवेगिरीबाबत प्राप्तिकर विभागाकडून तपास सुरू आहे.