महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

संगमनेरच्या ग्रुपकडून करचुकवेगिरीचा संशय; आयटी विभागाचे राज्यात ३४ मालमत्तांवर छापे

प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यांमध्ये कागदार लिहिलेली आकडेवारी आणि एक्सेल शीटमधून २४३ कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता असल्याचे आढळले आहे. तसेच काही तंबाखू डीलरकडे ४० कोटी रुपये असल्याचे प्राप्तिकर विभागाला आढळले आहे.

By

Published : Feb 22, 2021, 7:10 PM IST

प्राप्तिकर विभाग
प्राप्तिकर विभाग

नवी दिल्ली -प्राप्तिकर विभागाने संगमनेर येथील ग्रुपच्या राज्यातील ३४ मालमत्तांवर छापे टाकले आहेत. हा ग्रुप तंबाखुचे पॅकिजिंग आणि विक्री तसेच उर्जानिर्मिती, वितरण, एफएफसीजी विक्री आणि स्थावर मालमत्ता विकासात कार्यरत आहे.

प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यांमध्ये कागदार लिहिलेली आकडेवारी आणि एक्सेल शीटमधून २४३ कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता असल्याचे आढळले आहे. तसेच काही तंबाखू डीलरकडे ४० कोटी रुपये असल्याचे प्राप्तिकर विभागाला आढळले आहे. स्थावर मालमत्ता विभागाच्या व्यवसायातही या ग्रुपने करचुकवेगिरी केल्याचा प्राप्तिकर विभागाला संशय आहे. प्राप्तिकर विभागाला ३३५ कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता असल्याचे तपासात आढळून आले आहे. याप्रकरणी प्राप्तिकर विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा-सोन्याच्या दरात प्रति तोळा २७८ रुपयांची वाढ

दरम्यान, कोरोनाच्या काळात देशाच्या महसुलात घसरण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्राप्तिकर विभागाकडून करचुकवेगिरी प्रकरणात कठोर कारवाया करण्यात येत आहेत.

हेही वाचा-कोरोनाच्या लसीकरणात भारताला प्राधान्य; संयम बाळगण्याचे सीरमकडून देशांना आवाहन

ABOUT THE AUTHOR

...view details