नवी दिल्ली– कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना भारतीय विमा नियामक प्राधिकरणाने (आयआरडीए) ग्राहकांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. आयआरडीएने 29 जनरल आणि आरोग्य विमा कंपन्यांना कमी मुदतीचे ‘कोरोना कवच आरोग्य विमा’ सुरू करण्याची परवानगी दिली आहे.
काही विमा कंपन्यांनी तीन आणि साडेतीन महिन्यांच्या कालावधीच्या 'कोरोना कवच विमा योजना' जाहीर केल्या आहेत. तसेच सहा महिने, साडेसहा महिने, नऊ महिने आणि साडेनऊ महिन्यांच्या कालावधीच्या विमा योजना कंपनीने जाहीर केल्या आहेत. त्यासाठी ग्राहकांना किमान 50 हजार ते 5 लाखापर्यंतचा एकूण विमा हप्ता द्यावा लागतो.