नवी दिल्ली - गुंतवणूकदारांनी बर्गर किंग इंडियाच्या प्रारंभिक भागविक्रीला (आयपीओ) मोठी पसंती दर्शविली आहे. हा आयपीओ घेण्याच्या शेवटच्या दिवशी आज गुंतवणूकदारांनी १५६.६५ पटीने अधिक अर्जभरणा (सबस्क्राईब) केला आहे.
बर्गर किंग इंडियाचे आयपीओ पात्रताधारक संस्थात्मक खरेदीदारांनी (क्यूआयबीएस) ८६.६४ पटीने अधिक प्रमाणात अर्जभरणा केले आहेत. तर बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ३५४.११ पटीने अधिक प्रमाणात आयपीओ अर्जभरणा केले आहेत.
हेही वाचा-पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या तोंडावर आरबीआय सक्रिय; १९४ चिट फंडचा करणार नव्याने तपास
- बर्गर किंगला पहिल्या दिवशी काही तासातच मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांनी प्रतिसाद दिला.
- बर्गर किंगचा आयपीए हा ८१० कोटींचा आहे. त्यामध्ये ४५० कोटी रुपये किमतीचे शेअर आहेत.
- बर्गर किंगची प्रवर्तक कंपनी क्यूएसआर एशिया प्रा. कंपनीने ६ कोटी रुपयांचे शेअर विकले आहेत. एका शेअरची किंमत ही ५९ ते ६० रुपये आहे.
- बर्गर किंग इंडियाने अँकर गुंतवणुकीत ३६४.५ कोटी रुपये उभे केले आहेत.