नवी दिल्ली - जम्मू आणि काश्मीरचे ३७० कलम काढून टाकणे, हा देशाची एकता टिकविण्यासाठी चांगला निर्णय असल्याचे माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी मत व्यक्त केले. त्याचा जम्मू आणि काश्मीरला सर्वात अधिक फायदा होईल, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
कलम ३७० हटविल्याने गुंतवणुकीसह रोजगाराच्या संधी वाढणार - अरुण जेटली - Arun Jaitley
जम्मू आणि काश्मीरमध्ये अधिक गुंतवणूक, उद्योग, खासगी शिक्षण संस्था, अधिक रोजगार आणि अधिक महसूल होईल, असा विश्वास माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी व्यक्त केला.
अरुण जेटली
'कलम ३७० आणि कलम ३५ ए'मध्ये सुधारणा ही देशाला एकत्रण आणण्यासाठी सहाय्यकारी ठरणार आहे. अनेक मार्गाने हा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध होईल, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
जम्मू आणि काश्मीरमध्ये अधिक गुंतवणूक, उद्योग, खासगी शिक्षण संस्था, अधिक रोजगार आणि अधिक महसूल होईल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.