नवी दिल्ली -आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवेवरील निर्बंध ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवेच्या निर्बंधावर ३० नोव्हेंबरपर्यंत वाढ
आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवेवरील निर्बंधात आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीचा समावेश नाही. तसेच नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने (डीजीसीए) विशेष परवानगी दिलेल्या विमान उड्डाणांचा निर्बंधात समावेश नाही.
आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवेवरील निर्बंधात आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीचा समावेश नाही. तसेच नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने (डीजीसीए) विशेष परवानगी दिलेल्या विमान उड्डाणांचा निर्बंधात समावेश नाही. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवेवर निर्बंध लागू केले असले तरी काही ठरावीक मार्गावर वाहतूक सुरू राहणार असल्याचे डीजीसीएने म्हटले आहे.
सध्या, भारताने काही देशांबरोबर 'एअर बबल्स'मधून करार करत विमान वाहतूक सेवेला परवानगी दिली आहे. दरम्यान, कोरोना महामारीमुळे सरकारने २५ मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवेवर निर्बंध लागू केले आहेत. तर टाळेबंदी खुली करताना २५ मे रोजीपासून विमान वाहतूक सेवा सुरू केली आहे.