महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

आंतरराष्ट्रीय विमान सेवा 31 ऑगस्टपर्यंत राहणार बंद - आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा

नागरी विमान वाहतूक संचालनालयाने 26 जून 2020 ला आंतरराष्ट्रीय विमान सेवेवरील निर्बंधात वाढ केली होती. त्यावेळी काढलेल्या परिपत्रकात अंशत: बदल करून आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावरील निर्बंधात 31 ऑगस्ट 2021 पर्यंत वाढ केली आहे.

आंतरराष्ट्रीय विमान सेवा
आंतरराष्ट्रीय विमान सेवा

By

Published : Jul 30, 2021, 3:06 PM IST

नवी दिल्ली -नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (DGCA) आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवेवरील निर्बंध 31 ऑगस्ट 2021 पर्यंत वाढविले आहे. याबाबतचे परिपत्रक डीजीसीएने काढले आहे. आंतरराष्ट्रीय विमान सेवेची आज मुदत संपत होती. डीजीसीएनेपरिपत्रक काढून आंतरराष्ट्रीय विमान सेवेवरील निर्बंध एक महिन्यांनी पुन्हा वाढविले आहेत.

नागरी विमान वाहतूक संचालनालयाने 26 जून 2020 ला आंतरराष्ट्रीय विमान सेवेवरील निर्बंधात वाढ केली होती. त्यावेळी काढलेल्या परिपत्रकात अंशत: बदल करून आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावरील निर्बंधात 31 ऑगस्ट 2021 पर्यंत वाढ केली आहे. यापूर्वी 30 जून 2021 ला आंतरराष्ट्रीय विमान प्रवास सेवेमध्ये 31 जुलैपर्यंत वाढ केली होती.

हेही वाचा-CBSE 12 वीचा लागला 99% निकाल, या वेबसाईटवर बघा तुमचा निकाल

परिपत्रकात काय म्हटले आहे?

जरी आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर निर्बंध लागू झाले असले तरी आंतरराष्ट्रीय माल वाहतुकीवर निर्बंध लागू होणार नाहीत. निवडक मार्गांवर यंत्रणेने परवानगी दिली तर नियोजीत आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा सुरू राहिल, असे डीजीसीएने परिपत्रकात म्हटले आहे. यापूर्वीच्या परिपत्रकातही डीजीसीएने असेच नमूद केले होते.

हेही वाचा-30 जुलै राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आज पोटाचा त्रास जाणवेल; जाणून घ्या बाकी राशींचे भविष्य

विशेष विमान सेवांना मिळणार परवानगी-

देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना कोरोनाबाधितांचे प्रमाण रोज कमी होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा मार्च २०२० पासून बंद आहे. असे असले तरी वंदे भारत मिशनसारख्या विशेष आंतरराष्ट्रीय विमान सेवा मे २०२० पासून सुरू आहेत. भारताने २६ देशांबरोबर एअर बबलच्या माध्यमातून विमान सेवा जुलै २०२० पासून सुरू केली आहे. यामध्ये अमेरिका, संयुक्तर अरब अमिराती, भुतान आणि फ्रान्स या देशांचा समावेश आहे.

हेही वाचा-पीगासस हेरगिरी प्रकरण : 500 लोकांसह संघटनांकडून सरन्यायाधीशांना हस्तक्षेप करण्याची विनंती

ABOUT THE AUTHOR

...view details