नवी दिल्ली- भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) शेअर बाजारात सूचिबद्ध करण्यासाठी सरकारने आंतरमंत्रीय समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीत कंपनी व्यवहार मंत्रालयाचे सचिव, कायदा मंत्रालय व वित्त मंत्रालयाचे तीन सचिव असणार आहेत. एलआयसी शेअर बाजारात लवकर सूचिबद्ध होण्यासाठी या समितीकडून प्रक्रिया करण्यात येणार आहे.
डीआयपीएएम, डीईए आणि वित्त सचिव राजीव कुमार हे एलआयसीवरील आंतरमंत्रीय समितीत असणार असल्याचे सूत्राने सांगितले. एलआयसी शेअर बाजारात सूचिबद्ध करण्यासाठी मूल्यांकन आणि कायद्यात कोणत्या बदलांची गरज आहे, याबाबत आंतरमंत्रिय समिती विचार करणार आहे.