महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

'तरुण पिढी ओला व उबेरचा वापर करत असल्याने वाहन उद्योगावर परिणाम'

सरकार विविध उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करत आहे. त्यांचे प्रश्न सोडिवण्याचा प्रयत्न करत असल्याचे निर्मल सीतारामन यांनी सांगितले.  सरकारने पायाभूत क्षेत्रावर खर्च करण्यास सुरुवात केल्यानंतर मागणी वाढेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.

निर्मला सीतारामन

By

Published : Sep 10, 2019, 5:43 PM IST

Updated : Sep 10, 2019, 7:08 PM IST

चेन्नई- वाहन उद्योग तीव्र मंदीमधून जात असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्याचा ठपका अप्रत्यक्षपणे ओला व उबेरवर ठेवला आहे. तरुण पिढी ओला व उबेरचा वापर करत असल्याने वाहन उद्योगावर परिणाम झाल्याचे त्यांनी म्हटले.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पायाभूत क्षेत्रामधील गुंतवणूक ही टास्क फोर्सने अहवाल दिल्यानंतर सुरू करणार असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारने १०० दिवसात मिळविलेले यश सांगत असताना त्या बोलत होत्या.

तरुण पिढीने ट्रक व बस खरेदी करण्याचे थांबविल्याने त्यांची विक्री कमी झाली आहे, का असे ट्विट करत काँग्रेसने सीतारामन यांच्या विधानाची खिल्ली उडविली आहे.

सरकार विविध उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करत आहे. त्यांचे प्रश्न सोडिवण्याचा प्रयत्न करत असल्याचे निर्मल सीतारामन यांनी सांगितले.
सरकारने पायाभूत क्षेत्रावर खर्च करण्यास सुरुवात केल्यानंतर मागणी वाढेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. पुढे त्या म्हणाल्या, पायाभूत प्रकल्पावर १०० लाख कोटी खर्च करणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. कोणत्या पायाभूत प्रकल्पावर खर्च करायचा आहे, हे टास्क फोर्स निश्चित करणार आहे.

हेही वाचा-ज्वेलरी उद्योगाला मंदीची मोठी झळ, हजारो कुशल कारागिरांचे रोजगार संकटात


चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत केवळ ५ टक्के जीडीपीची नोंद झाली आहे. याबाबत बोलताना सीतारामन यांनी भूतकाळातही असे चढ-उतार आले होते, असे सांगितले. काहीवेळा जीडीपीत चढ-उतार होत असतात. सरकार जीडीपी वाढविण्यावर काम करत आहे.

हेही वाचा-प्लास्टिक बॉटल नष्ट करून मोबाईल रिचार्ज करा; रेल्वे मंत्रालयाचा उपक्रम

जीएसटीमध्ये समावेश असलेल्या उत्पादनांची संख्या (बास्केट) वाढविण्यावर केंद्र आणि राज्य सरकारने चर्चा करण्याची गरज आहे. वाहन उद्योगावरील जीएसटीबाबतचा विषय जीएसटी परिषदेकडे असल्याचे सांगून त्यांनी त्याबाबत प्रतिक्रिया दिली नाही. बँकांच्या विलिनीकरणाबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, काही बँकांकडे बचत आहे, मात्र कर्जाची मागणी नाही. तर काही बँकांकडे कर्जाची मागणी आहे, पण बचत कमी आहे. अर्थव्यवस्था वाढत असताना बँकांनीही आणखी मोठे होण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा-भारत-नेपाळ दरम्यानच्या पेट्रोलिअम पाईपलाईनचे उद्घाटन; देशाची ३.५ अब्ज रुपयांची गुंतवणूक

Last Updated : Sep 10, 2019, 7:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details