महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

इन्फोसिसने अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकरिता लाँच केले मोफत शैक्षणिक अॅप

इन्फीटीक्यू माध्यमातून विद्यार्थ्यांना कधीही, कोठेही शिकता येणार

1

By

Published : Feb 16, 2019, 6:25 PM IST

नवी दिल्ली - देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या इन्फोसिस या आयटी कंपनीने इन्फी(टीक्यू) हे अॅप लॉन्च केले आहे. या शैक्षणिक अॅपमधून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सोपे होणार आहे.

इन्फीटीक्यू हे अॅप अभियांत्रिकी शाखेत तिसऱ्या आणि चौथ्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. यामध्ये व्यावसायिक कौशल्य विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हे अॅप मोबाईल आणि अॅप या दोन्ही माध्यमात उपलब्ध असणार आहे.

काय आहे अॅपमध्ये-

ऑनलाईन अभ्यासक्रम, प्रश्न तसेच प्रमाणपत्र मिळणार आहे. इन्फीटीक्यू माध्यमातून विद्यार्थ्यांना कधीही, कोठेही शिकता येणार आहे. या माध्यमातून डिजीटल कौशल्य विकसित करण्यासाठी इन्फोसिस इनोव्हेशन इकोसिस्टिमच्या मदतीने साहाय्य करण्यात येणार आहे. तसेच इन्फोसिसच्या संस्कृतीची ओळखही विद्यार्थ्यांना होणार आहे. यामधील अभ्यासक्रम हा प्रात्यक्षिकावर आधारित असल्याचे इन्फोसिसने म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details