महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

'कोरोना'चा आयातीवर परिणाम; सीआयआयची मोदी सरकारकडे अनुदानाची मागणी - सीआयआय

भारत चीनमधून विविध वस्तुंची ४३ टक्के प्रमाणात आयात करतो. चीनमध्ये कोरोनोच्या विषाणुजन्य रोगाने हजारो जणांचा मृत्यू झाला आहे. तर चीनमधील ४ प्रांत आणि ५० शहरांमधील उद्योग, दळणवळण ठप्प झाले आहेत. त्यामुळे चीनमधून भारतात होणारी आयात विस्कळित झाली आहे.

CII
सीआयआय

By

Published : Feb 18, 2020, 1:19 PM IST

नवी दिल्ली - भारतीय औद्योगिक महासंघाने (सीआयआय) मोदी सरकारला काही महत्त्वाच्या सुधारणांची शिफारस केली आहे. कोरोनाचा फटका बसल्याने चीनमधून होणारी आयात विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सीआयआयने मोदी सरकारकडे अनुदानाची मागणी केली आहे.

भारत चीनमधून विविध वस्तुंची ४३ टक्के प्रमाणात आयात करतो. चीनमध्ये कोरोनोच्या विषाणुजन्य रोगाने हजारो जणांचा मृत्यू झाला आहे. तर चीनमधील ४ प्रांत आणि ५० शहरांमधील उद्योग, दळणवळण ठप्प झाले आहेत. त्यामुळे चीनमधून भारतात होणारी आयात विस्कळित झाली आहे.

संबंधित बातमी वाचा-चीनच्या कोरोनाने भारतीय उद्योगांची 'दमछाक', पोल्ट्री व्यवसायावरही परिणाम

कोरोना विषाणुचा विविध उद्योगांवर परिणाम होणार असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. त्यामुळे पुरवठा साखळी विस्कळित होवू नये, यासाठी सरकारने महत्त्वाच्या क्षेत्रांची जोखीम कमी करावी, असे सीआयआयने म्हटले आहे.

हेही वाचा-गुगलच्या ब्रेकनंतरही रेल्वे स्थानकांवरील वायफाय राहणार 'सुस्साट'

या आहेत सीआयआयच्या मागण्या-

  • चीनमधील उत्पादन आणि पुरवठा पूर्ववत झाल्यास उत्पादनांची अतिरिक्त खरेदी करण्यासाठी सरकारने बायबॅक गॅरंटी द्यावी.
  • देशातील उपभोक्ततेप्रमाणे उत्पादनाचा तातडीने पुरवठा करण्याऱ्या कंपन्यांना कर्जावर हमी द्यावी.
  • चीनमधून आयात होणाऱ्या उत्पादनाच्या पुरवठ्यात अडथळा निर्माण झाला आहे. अशा स्थितीत दुसऱया देशांमधून आयात करण्यात येणाऱया उत्पादनांवरील आयात शुल्क कमी करावे.
  • कंपन्यांना पतमानांकनांची चिंता वाटू नये, याकरता एक वेळ अनुत्पादक मालमत्ता नियम (एनपीए रेग्युलेशन) माफ करावा.

ABOUT THE AUTHOR

...view details