नवी दिल्ली - इंडिगोच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने विमान प्रवाशांना मन:स्ताप सहन करावा लागत आहेत. देशभरातील विविध विमानतळावर प्रवाशांच्या रांगा लागल्या आहेत.
सर्व्हरमध्ये बिघाड होण्यापूर्वी प्रवाशांना माहिती देण्यात आल्याचे इंडिगोने म्हटले आहे. कंपनीने ट्विट करून नेटवर्कमधील सिस्टिम्स आज सकाळपासून बंद पडल्याचे सांगितले. सर्व्हरमधील बिघाडाचा परिणाम म्हणून देशातील सर्व विमानतळावरील इंडिगोच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. हा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात असल्याचे इंडिगोने म्हटले आहे.
हेही वाचा-बँकॉक : पंतप्रधान नरेंद्र मोदी आरसीईपी परिषेदत आज उपस्थित राहणार
इंडिगोचा देशातील विमान वाहतुकीच्या बाजारपेठेमध्ये सर्वात मोठा हिस्सा आहे. इंडिगोची देशातील ६० ठिकाणी तर विदेशात २३ ठिकाणी रोज १ हजार ५०० विमान उड्डाणे होतात. कंपनीकडे सुमारे २४५ विमाने आहेत. नागरी विमान वाहतूक संचालनालयाच्या महासंचालकांनी इंडिगोला विमानातील सदोष इंजिने बदलण्याची सूचना केली होती. या आदेशाची अंमलबजावणी न केल्याने इंडिगोने काही विमाने सेवेतून काढली आहेत.
हेही वाचा-शेअर बाजाराचा सर्वोच्च विक्रमी उच्चांक; 269 अंशाने वधारून पोहोचला 40,435 वर