नवी दिल्ली- कोरोना महामारीने विमान वाहतूक क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अशा स्थिती इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोनोजॉय दत्ता यांनी वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करणार असल्याचे जाहीर केले. तर स्वत:चे वेतनही २५ टक्क्यांनी कमी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोनोजॉय दत्ता यांनी कर्मचाऱ्यांना ई-मेल करून कंपनीच्या स्थितीची माहिती दिली आहे. त्यांनी ई-मेल म्हटले आहे, की कंपनीच्या महसुलात घसरण झाली आहे. त्यामुळे विमान वाहतूक उद्योगाचे अस्तित्व पणाला लागले आहे. सर्व पैसे संपू नये, यासाठी पैशांकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायला हवे.
हेही वाचा-केंद्र सरकार पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क पुन्हा वाढविण्याची शक्यता