नवी दिल्ली– चीनच्या मालावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत असताना प्रत्यक्षात देशातील स्थिती वेगळी आहे. भारत अनेक उत्पादनांच्याबाबतीत चीनवर अवलंबून आहे. त्यामुळे चीनच्या मालावर बहिष्कार टाकण्याची अंमलबजावणी करणे सोपे ठरणार नाही.
भारत-चीनमध्ये सीमारेषेवर तणाव असताना भारतीय उद्योग आणि ग्राहक हे चीनच्या उत्पादनांवर आणि भांडवलावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. भारत चीनमधून डायअमोनिय फॉस्फेट, म्युरियट ऑफ पोटॅश, नायट्रोजन आणि पोटॅश कम्पोझिशियनची विवध देशांमधून आयात करतो. यामध्य चीनमधील खतांचा आयातीत सर्वात मोठा हिस्सा आहे. अखिल भारतीय शेतकरी आघाडी संघटनेचे (एआयएफए) राष्ट्रीय समन्वयक राजा राम त्रिपाठी म्हणाले, की कमी दरात मिळणारे खते आणि सहज होणारी वाहतूक या कारणांनी भारत चीनमधून खतांच्या आयातीला प्राधान्य देतो.
चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकणे सोपे नाही, कारण... याशिवाय भारत इतर 15 देशांमधून खतांची आयात करतो. सौदी अरेबियामधून भारत मोठ्या प्रमाणात खतांची आयात करतो. राज्यांच्या मागणीप्रमाणे खत पुरवठा होण्यासाठी खत कंपन्यांकडून पुरवठा केला जातो. देशाला खतांच्याबाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी मोठ्या कंपन्यांची देशाला गरज आहे. खत उद्योगात सरकारी लालफितीच्या कारभाराचा मोठा अडथळा आहे. जर कोणी खत कंपनी काढण्यासाठी प्रयतन केला तर त्यासाठी वेळ लागतो. सर्व प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार असल्याचेही त्यांनी सांगितले. आयातीचे खत देशातील 30 जहाज बंदरांमधून उतरविले जाते.
चीनच्या सैनिकांबरोबर झालेल्या झटापटीत 20 भारतीय जवानांना वीरमरण आले आहे. त्यानंतर देशात चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्यासाठी व्यापारी संघटना आणि अनेक नागरिक मागणी करत आहेत.