महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

कच्च्या मालाच्या पुरवठ्याकरिता सरकारने हस्तक्षेप करावा-ऑक्सिजन कंपनीची मागणी - एमव्हीएस इंजीनियरिंग

एमव्हीएस इंजिनियरिंग प्रायव्हेट लि. कंपनीचे कार्यकारी संचालक सिद्धार्थ रस्तोगी म्हणाले, की कंपनीजवळ दिली-एनसीआरसहित देशातील अनेक रुग्णालयांना ऑक्सिजन पुरविण्याची ऑर्डर आहे. मात्र, त्यासाठी जिओलाई मॉलिक्युलर सिव्स उपलब्ध नाहीत.

ऑक्सिजन कंपनी
ऑक्सिजन कंपनी

By

Published : Jun 14, 2021, 3:52 PM IST

नवी दिल्ली - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची गरज कमी होत असली तरी उत्पादनात समस्या निर्माण झाली आहे. औद्योगिक गॅस उत्पादक कंपनी एमव्हीएस इंजिनिअरिंग कंनपीने वैद्यकीय ऑक्सिजनच्या निर्मितीसाठी तातडीने केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे. वैद्यकीय ऑक्सिजनच्या निर्मितीसाठी मॉलिक्युलर सिव्स पुरविण्याकरिता कंपनीने सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

नवी दिल्लीमधील एमव्हीएस इंजिअरिंग ही देशातील औद्योगिक गॅस उत्पादनामधील आघाडीची कंपनी आहे. महामारीच्या काळात कंपनीने ऑक्सिजन पुरवठा वाढविण्यासाठी एका वर्षातच ४० पीएसए ऑक्सिजन संयंत्र लावले आहेत.

हेही वाचा-आयएल अँड एफएसमध्ये १ लाख कोटींचा घोटाळा; चेअरमन पार्थसारथीला चेन्नई पोलिसांकडून अटक

मॉलिक्यूलर सिव्स हे करते काम-

एमव्हीएस इंजिनियरिंग प्रायव्हेट लि. कंपनीचे कार्यकारी संचालक सिद्धार्थ रस्तोगी म्हणाले, की कंपनीजवळ दिली-एनसीआरसहित देशातील अनेक रुग्णालयांना ऑक्सिजन पुरविण्याची ऑर्डर आहे. मात्र, त्यासाठी जिओलाई मॉलिक्युलर सिव्स उपलब्ध नाहीत. त्यामुळे मागणीप्रमाणे ऑक्सिजनचा पुरवठा करणे शक्य होत नाही. प्रेशर स्विंग अॅडसॉर्प्शन (पीएसए) प्रक्रियेंतर्गत हवेतून ऑक्सिजन वेगळा करण्यासाठी लागणारे जिओलाईट मॉलिक्यूलर सिव्स हे फ्रान्स, इटली आणि इतर देशांमधून आयात करण्यात येतात.

हेही वाचा-विदेशी गंगाजळीने पहिल्यांदाच ओलांडला 600 अब्ज डॉलरचा टप्पा!

कच्चा माल नसल्याने ऑक्सिजन पुरवठ्यावर होणार परिणाम-

मॉलिक्यूलर सिव्स उपलब्ध नसल्याने सरकारी संस्थांसह काही खासगी संस्थांना ऑक्सिजन पुरविण्याची ऑर्डर रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे कंपनीला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. कच्च्या मालाचा कृत्रिम तुटवडा कमी करण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केल्याचे रस्तोगी यांनी सांगितले. संपूर्ण देशामधील ५० रुग्णालयांच्या ऑर्डर आहेत. तर इतर २०० ऑर्डरसाठी चर्चा सुरू आहे. मात्र, कच्चा माल मिळाला नाही, तर त्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली आहे.

हेही वाचा-अदानी उद्योग समुहाकरिता आज शेअर बाजारात ठरला काळा दिवस

ABOUT THE AUTHOR

...view details