महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

GDP Growth : 2021-22 मध्ये देशाच्या जीडीपीत 9.2% वाढ होण्याची शक्यता

नॅशनल स्टॅटिस्टिकलन ऑफिस ( National Statistical Office ) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 2020-21 मधील जीडीपीच्या ( GDP India 2021-22 ) तात्पुरत्या अंदाजाच्या तुलनेत 2021-22 मध्ये स्थिर किंमतींवर जीडीपी 147.54 लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.

GDP Growth
GDP Growth

By

Published : Jan 8, 2022, 3:41 PM IST

Updated : Jan 8, 2022, 5:29 PM IST

नवी दिल्ली :भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) (India's Gross Domestic Product) 2021-22 मध्ये 9.2 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी 7.3 टक्के नोंदवले होते.

नॅशनल स्टॅटिस्टिकलने (National Statistical Office) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 2020-21 मधील जीडीपीच्या तात्पुरत्या अंदाजाच्या तुलनेत 2021-22 मध्ये स्थिर किंमतींवर जीडीपी 147.54 लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे, असे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जाहीर केलेल्या अहवालात नमूद केले आहे.

देशाच्या जीडीपीत होईल वाढ

2021-22 मध्ये नाममात्र GDP मधील वाढ 17.6 टक्के राहण्याचा अंदाज आहे. मूळ किमतींवर नाममात्र GVA 2021-22 मध्ये 210.37 लाख कोटी रुपये होईल असा अंदाज आहे. 2020-21 मध्ये 179.15 लाख कोटी रुपये म्हणजेच 17.4 टक्के एवढी वाढ दर्शवते.

31 मे 2021 रोजी जाहीर झालेल्या 2020-21 च्या GDP चा तात्पुरता अंदाज 197.46 लाख कोटी रुपये एवढा होता. तो सध्याच्या किंमतींवर नाममात्र GDP 232.15 लाख कोटी रुपये राहील, असा अंदाज आहे.

हेही वाचा -Bitcoin drops : यूएस फेडच्या व्याजदर वाढीनंतर बिटकॉइनची घसरण

Last Updated : Jan 8, 2022, 5:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details