नवी दिल्ली- देशाच्या निर्यातीत सलग चौथ्या महिन्यात घसरण झाली आहे. नोव्हेंबरमध्ये निर्यातीत ०.३४ टक्के घसरण होवून २५.९८ अब्ज डॉलर झाली आहे. पेट्रोलियम उत्पादने, जेम्स अँड ज्वेलरी आणि कातडी उत्पादन्यांच्या निर्यातीत घसरण झाल्याने एकूण निर्यातीत घसरणीची नोंद झाली आहे.
निर्यातीबरोबर नोव्हेंबरमध्ये आयात १२.७१ टक्के घसरून ३८.११ अब्ज डॉलरची नोंद झाली आहे. त्यामुळे देशाची व्यापारी तूट १२.१२ अब्ज डॉलरने कमी झाली आहे. सोने आयात ६.५९ टक्के वाढून २.९४ अब्ज डॉलरची नोंद झाली आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये व्यापारी तूट १७.५८ अब्ज डॉलर झाली आहे. देशातील ३० क्षेत्रापैकी १७ क्षेत्रामधील वस्तुंच्या निर्यातीत घसरण झाली आहे.
हेही वाचा-'५जी' स्पेक्ट्रमचा होणार लिलाव; केंद्रीय दूरसंचार विभागाने कंपन्यांकडून मागविली बोली
अशी झाली निर्यातीत घसरण (टक्क्यांमध्ये)
- पेट्रोलियम उत्पादने-१३.१२
- रत्ने आणि मौल्यवान दागिने - ८.१४
- फळे आणि भाजीपाला - १५.१०
- कातडे व कातड्याची उत्पादने - ५.२९
- रेडीमेड कापड -६.२९
नोव्हेंबरमध्ये कच्च्या तेल आयातीत १८.१७ टक्क्यांची घसरण होवून ११.०६ अब्ज डॉलर झाली होती. एप्रिल-नोव्हेंबर २०१९ मध्ये एकूण निर्यातीत १.९९ घसरण होवून २११.९३ अब्ज डॉलरची नोंद झाली आहे. तर एप्रिल-नोव्हेंबर २०१९ मध्ये एकूण आयातीत ८.९१ टक्के घसरण होवून ३१८.७८ अब्ज डॉलरची नोंद झाली आहे.
हेही वाचा-केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला तर आर्थिक सर्व्हे ३१ जानेवारीला सादर होण्याची शक्यता
ईईपीसी इंडियाचे चेअरमन रवी सेहगल म्हणाले, अभियांत्रिकी उत्पादनांच्या निर्यातीत चांगली वाढ झाली आहे. ही वाढ नोव्हेंबरमध्ये ६.३२ टक्के झाली आहे. स्टीलसारख्या कच्च्या मालाच्या महागड्या किमतीचा प्रश्न आमच्यासमोर आहे. हे प्रश्न सोडविण्यासाठी सरकारसोबत काम करत असल्याचे सेहगल यांनी सांगितले.