नवी दिल्ली - व्हिडिओ ऑन डिमांडच्या स्ट्रिमिंगच्या सेवेने आता लोकप्रियतेत टीव्हीलाही मागे टाकले आहे. कारण व्हिडिओ ऑन डिमांडच्या सेवेसाठी पैसे खर्च करण्यात भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. प्रेक्षकांच्या सवयी बदलत असल्याने केबल टीव्ही आणि सेट टॉप बॉक्सचे अस्तित्व धोक्यात येण्याची भीती अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
जर्मनीच्या स्टॅटिस्टा या संशोधन करणाऱ्या संस्थेने डिजीटल अर्थव्यवस्थेवर प्रसिद्ध केला आहे. यामध्ये म्हटले आहे, की व्हिडिओ ऑन डिमांड सेवेसाठी पैसे खर्च करण्याची तयारी चीन, ब्राझीलनंतर भारतामधील नागरिक दाखवितात. हे प्रमाण ५२ टक्के आहे.