महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

ऑनलाईन कंटेन्ट पाहण्यात भारतीय जगात प्रथम; रोज 'इतका' वेळ घालवतात - Indian consumers report on using content streaming

जगभरातील ग्राहक हे दररोज चार तास व्हिडिओ ऑनलाईन पाहतात. हे प्रमाण पाहता देशात  व्हिडिओचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे लाईमलाईट नेटवर्क्सने म्हटले आहे. ही कंपनी डिजीटल कंटेन्ट देणारे माध्यम आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

By

Published : Jun 25, 2020, 3:55 PM IST

नवी दिल्ली – टाळेबंदी लागू केल्यानंतर देशात स्ट्रिमिंग कंटेन्ट पाहण्याच्या वेळेत वाढ झाली आहे. भारतीय ग्राहक हे ऑनलाईन व्हिडिओ कंटेन्ट पाहण्याकरता रोज सरासरी 5 तास 16 मिनिटे घालवितात. हे जगात सर्वाधिक प्रमाण असल्याचे एका अहवालात म्हटले आहे.

जगभरातील ग्राहक हे दररोज चार तास व्हिडिओ ऑनलाईन पाहतात. हे प्रमाण पाहता देशात व्हिडिओ पाहण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे लाईमलाईट नेटवर्क्सने म्हटले आहे. ही कंपनी डिजीटल कंटेन्ट देणारे माध्यम आहे.

देशात 97.8 टक्के लोकांना व्हिडिओ चॅट केल्याने अधिक चांगला संपर्क होतो, असे वाटते. 65.4 टक्के लोक दिवसातून अनेकवेळा व्हिडिओ चॅटिंग करतात.

लाईमलाईट नेटवर्कचे विक्री संचालक अश्विन राव म्हणाले, की गेल्या काही महिन्यात ऑनलाईन सर्व प्रकारचे ऑनलाईन व्हिडिओ पाहण्यात नाट्यमय आणि नवे वर्तणुकीचे बदल झाले आहेत. कोरोनाच्या संकटाने सिद्ध झाले, की भारतीय हे नवे तंत्रज्ञान स्विकारण्यासाठी नेहमी तयार असतात. कोरोना महामारीमुळे स्ट्रिमिंग हे मनोरजंन आणि बातम्यांपलीकडे पोहोचले आहे. लोक दुसऱ्यांशी संपर्क करणे आणि महत्त्वाची माहिती मिळविण्यासाठी ऑनलाईन व्हिडिओचा वापर करत आहेत.

  • स्वस्तामध्ये उपलब्ध झालेल्या इंटरनेट प्लॅनमुळे स्ट्रिमिंगचा वापर ही सामान्य बाब झाली आहे. देशातील 64.3 टक्के ग्राहकांनी महामारीच्या काळात पहिल्यांदा ई-क्रीडाचा अनुभव घेतला आहे. लाईव्ह कार्यक्रम रद्द झाले असले तरी 68.8 भारतीयांनी लाईव्ह कार्यक्रमात सहभाग घेतला आहे.
  • व्यायाम ऑनलाईन करम्यात येत आहे. देशातील सुमारे 55.6 लोकांनी ऑनलाईन फिटनेस वर्गात सहभाग घेतल्याचे सांगितले. तर 26. 8 टक्के लोकांनी येत्या सहा महिन्यात ऑनलाईन व्हिडिओमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले. तसेच ग्राहक महत्त्वाची माहिती मिळविण्यासाठी ऑनलाईन स्ट्रिमिंगचा वापर करत आहेत.
  • कोरोनाच्या संकटकाळात 91.7 टक्के लोकांनी ऑनलाईन व्हिडिओतून भाषण आणि पत्रकार परिषदांची माहिती घेतली. तर 70. 3 टक्के लोकांनी लाईव्ह स्ट्रिमिंगच्या बातम्यांच्या वेबसाईट, 21.4 टक्के लोकांनी समाज माध्यमामधून लाईव्ह स्ट्रिमिंगचा वापर केला.
  • दुसऱ्या महायुद्धाच्या वर्षात जन्मलेले (बेबी बूमर) लो 63 लोकदेखील लाईव्ह स्ट्रिमिंग बातम्या आणि माहिती ऑनलाईन पाहत आहेत.
  • महामारीमुळे अनेकांना कामाच्या ठिकाणाहून दूर ठिकाणी काम करावे लागत आहे. असे असले तरी 93.8 टक्के लोकांनी व्हिडिओ साधनांमुळे रोजच्या दैनंदिन क्रिया करणे शक्य झाल्याचे सांगितले. 30. 8 टक्के लोकांनी पहिल्यांदाच घरातून काम केले आहे. तर 23.3 टक्के लोकांनी ऑनलाईन व्हिडिओमुळे सहकाऱ्यांशी संपर्कात राहणे शक्य झाल्याचे सांगितले. 50 टक्के लोकांनी ऑनलाईन व्हिडिओमुळे काम कार्यक्षमतेने करणे शक्य झाल्याचे सांगितले.
  • 67.3 टक्क्यांहून अधिक लोकांनी ऑनलाईन व्हिडिओ व्यवसायिक कामासाठी वापरणार असल्याचे सांगितले.
  • महामारीने टेलिहेल्थचाही (दूरस्थ परिस्थितीने आरोग्य तपासणी, सल्ला) देशात वापर वाढला आहे.
  • सर्वेक्षणातील 45.8 टक्के लोकांनी डॉक्टरांकडून व्हिडिओ सेवेद्वारा सल्ला घेतल्याचे सांगितले. हा ट्रेण्ड महामारीच्या संकटानंतरही सुरू राहिल, असे अहवालात म्हटले आहे. जगभरातील 34.6 टक्के लोकांनी टेलिहेल्थद्वारे डॉक्टरांची भेट येत्या सहा महिन्यांत घेणार असल्याचे सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details