नवी दिल्ली- देशभरात लागू करण्यात आलेली टाळेबंदी भारतीय अंत्रेप्रेनेन्युर आणि गुंतवणूकदार समुदायाच्या उत्साहावर विरजण टाकण्यात अपयशी ठरली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्चला संपूर्ण देशात टाळेबंदी लागू केली. त्यामागे कोरोनाचा संसर्ग अधिक पसरू नये, हा हेतू होता. देशामध्ये सुमारे 6 हजार 600 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर जगभरात गेल्या सहा महिन्यात कोरोनामुळे सुमारे चार लाख जणांचा जगभरात मृत्यू झाला आहे.
जगभरातील विविध देशांसह भारत सरकारने उद्योग आणि व्यवसाय बंद केले. देशातील रेल्वे ,विमान आणि रस्ते वाहतूक बंद केली. त्यानंतर देशातले आर्थिक चलन वलन प्रक्रिया पूर्ण बंद पडली. त्याचा परिणाम म्हणून जागतिक अर्थव्यवस्थेचे सुमारे नऊ लाख कोटी डॉलरचे चालू वर्षात नुकसान होणार आहे.
असे असले तरी भारतीय स्टार्टअपची मानवाच्या सर्वात कठीण काळात कोरोनाच्या संकटात घोडदौड सुरू आहे. अमेरिका, चीन त्यानंतर भारताचा जगात स्टार्ट अपच्या क्षेत्रात तिसरा क्रमांक आहे.
मुंबईस्थित युनिकॉर्न इंडिया वेंचरचे संस्थापक व व्यवस्थापकीय भागीदार अनिल जोशी म्हणाले, की स्टार्टअपच्या अर्जांमध्ये निश्चितच संख्या वाढली आहे.