नवी दिल्ली- चीनने देशातील कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील चार आर्थिक वर्षांमध्ये चीनने देशातील १ हजार ६००हून अधिक कंपन्यांमध्ये थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) केल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांनी राज्यसभेत दिली. या देशातील कंपन्यांमध्ये चीनच्या कंपन्यांना १ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे.
देशातील कंपन्यांमध्ये विशेषत: स्टार्टअपमध्ये चीनच्या कंपन्यांनी किती गुंतवणूक केली, असा प्रश्न विरोधकांनी सरकारला विचारला होता. त्यावर केंद्रीय राज्य अर्थमंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी लेखी उत्तरातून राज्यसभेत माहिती दिली. चीनी कंपन्यांनी देशातील कंपन्या व स्टार्टअपमध्ये १.०२ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक ४६ क्षेत्रातील कंपन्यांमध्ये करण्यात आली आहे. यामध्ये वाहन उद्योग, पुस्तकांची छपाई (लिथो प्रिटिंग इंडस्ट्रीज), इलेक्ट्रॉनिक्स, सेवा आणि इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आदी क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश आहे.
हेही वाचा-टिकटॉकला पर्याय ठरू शकणारे यूट्यूबचे 'शॉर्टस' भारतात लाँच