नवी दिल्ली- कोरोना महामारीच्या संकटातून भारतीय वाहन उद्योग सावरणार आहे. वाहन उद्योगाच्या विकासदरात २०२१-२२ मध्ये वाढ होणार असल्याचा अंदाज नोमूर रिसर्च इन्स्टिट्यूट कन्सल्टिंग अँड सोल्यूशन्स इंडियाने वर्तविला आहे.
नोमूराच्या अंदाजानुसार इलेक्ट्रिक वाहने, दुचाकी वाहनांच्या विक्रीत पुढील वर्षी वाढ होण्याची शक्यता आहे. असे असले तरी वैयक्तिक वाहनांच्या श्रेणीत फारशी सुधारणा होणार आहे. वैयक्तिक वाहनांच्या श्रेणीतील वाहने ही २०२३-२४ मध्ये २०१८-१९ मधील विक्रीचा टप्पा गाठ शकणार आहेत.
हेही वाचा-मेक इंडियाला प्रोत्साहन देण्याकरता सरकारकडून ४० हजार कोटींची कंत्राटे रद्द
- सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चुअर्सच्या (एसआयएएम) आकडेवारीनुसार २०१८-१९ मध्ये प्रवासी वाहनांची २.७ टक्क्यांनी विक्री वाढली होती.
- कोरोनाचा वाहन उद्योगाला मोठा फटका बसला आहे. मात्र, पुढील वर्षात वाहन उद्योगाच्या व्यवसायात मोठी सुधारणा होईल, असे नोमुराचे ग्रुप हेड अशिम शर्मा यांनी सांगितले. वाहनांसाठी नवीन नियम लागू केले आहेत. त्यामुळे वाहनांच्या किमती वाढणार असल्याचेही शर्मा यांनी म्हटले.
- २०१८-१९ मध्ये दुचाकी वाहनांची विक्री ४.८६ टक्क्यांनी वाढून २ लाख ११ हजार ८१ हजार ३९० झाली होती. तर २०१७-१८ मध्ये २ लाख २ हजार ११७ वाहनांची विक्री झाली होती. इलेक्ट्रिक वाहनांसाठी २०२१-२२ हे वर्ष सकारात्मक ठरणार आहे. विशेषत: दुचाकी वाहनांच्या इलेक्ट्रिक श्रेणीसाठी हे वर्ष महत्त्वाचे ठरणार आहे. कारण, ओला इलेक्ट्रिक कंपनी ही दुचाकी वाहनांच्या स्पर्धेत उतरणार आहे.
हेही वाचा-पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर; सरकारी कंपन्यांचे 'थांबा आणि वाट पाहा'चे धोरण
दरम्यान, नवीन वर्षात बहुतांश सर्व चारचाकी वाहनांच्या किमती वाढणार आहेत.